ब्रेकिंग : सोलापुरात दिवसभरात कोरोनाचे 6 पॉझिटिव्ह रुग्ण वाढले ; रुग्णांची संख्या 39 - Mangalwedha Times

Breaking

Thursday, April 23, 2020

ब्रेकिंग : सोलापुरात दिवसभरात कोरोनाचे 6 पॉझिटिव्ह रुग्ण वाढले ; रुग्णांची संख्या 39


मंगळवेढा टाईम्स वृत्तसेवा । सोलापूर शहरात सहा रुग्णांची वाढ आज 39 व्यक्तींचे अहवाल पॉझिटिव्ह आले असून काल त्यांची संख्या 33 होती त्यात वाढ होऊन आज 39 झाले असल्याची माहिती जिल्हाधिकारी मिलिंद भरकर यांनी दिली आहे.


आज चार पुरुष आणि दोन महिला यांचे रिपोर्ट पॉझिटिव्ह आले आहेत दोन व्यक्ती बापूजी नगर परिसरातील आहेत शास्त्रीनगर लष्कर सदर बाजार परिसरातील एक व्यक्ती आहे.एक व्यक्ती इंदिरानगर परिसरातील आहे शेवटची व्यक्ती कुरबान हुसेन नगर परिसरातील आहे.

सोलापूर शहर हद्दीमधील सध्याची सुरु असलेली संपूर्ण संचारबंदी आता 27 एप्रिल च्या रात्री 12 वाजेपर्यंत वाढविण्यात आली आहे.मात्र उद्या शुक्रवार दिनांक 24 रोजी सकाळी 8 ते दुपारी 2 या कालावधीत योग्य सोशल डिस्टन्स नियमांचं पालन करून, केवळ किराणा, दूध, फळे, भाजीपाला गॅस सिलेंडर या खरेदीसाठी सवलत देण्यात आली आहे.
    

या काळात नागरिकांनी शक्यतो त्यांच्या घराजवळील दुकान आस्थापन येथेच खरेदी करायची आहे.हि सवलत सोलापूर शहरातील प्रतिबंधित क्षेत्रांना मात्र लागू नाही. म्हणजे इथे  कोणालाही घरा बाहेर पडता येणार नाही.येथील नागरिकांसाठी सध्या सुरू असलेल्या पद्धतीने सर्व अत्यावश्यक सेवा घरपोच उपलब्ध करून देण्यात येत आहेत.


जिल्हाधिकारी मिलिंद शंभरकर यांनी हा नवीन आदेश आज सायंकाळी प्रसिद्ध केला आहे.अत्यावश्यक वैद्यकीय सेवा पुरवणारे खाजगी, सरकारी वैद्यकीय अधिकारी त्यांच्याशी संबंधित कर्मचारी, वाहन ,संबंधीत कर्मचारी वाहन ॲम्ब्युलन्स सेवा, रुग्णालयातील औषध दुकान ,शासकीय अत्यावश्यक सेवेतील अधिकारी-कर्मचारी ,महसूल ,पोलिस, पाणीपुरवठा, विद्युतपुरवठा येथील कर्मचारी यांना या आदेशातून सवलत देण्यात आली आहे.
 

संचार बंदीच्या काळात रोज सकाळी 6 ते 9 या वेळेत दूध वाटप व विक्री करण्यास मुभा आहे. तर शहरातील पेट्रोल पंप या काळात रोज सकाळी  7 ते 11 या कालावधीत केवळ अत्यावश्यक सेवेतील वाहनांसाठी सुरू राहतील असेही या आदेशात नमूद करण्यात आलं आहे.


संचार बंदी चे नियम कोणीही मोडू नयेत, पोलिसांची गस्त सुरू आहे. याचबरोबर ड्रोन कॅमेरानेही गल्लीबोळा वर नजर ठेवण्यात येत आहे. जे कोणी सापडतील त्यांच्यावर कठोर कायदेशीर कारवाई केली जाईल असा सज्जड इशारा सोलापूरचे पोलीस आयुक्त अंकुश शिंदे यांनी दिला आहे.


सोलापूर ग्रामीणचे पोलीस अधीक्षक मनोज पाटील यांनी एक आदेश प्रसिद्ध करून सोलापूर शहरात येणारे सोलापूर ग्रामीण हद्दीतील आंतरजिल्हा, आंतरराज्य सरहद्दीवरील 9 लहान मोठे रस्ते 3 मे च्या मध्यरात्रीपर्यंत वाहतुकीसाठी बंद केले आहेत. यासाठी त्यांनी ग्रामीण भागासाठी पर्यायी रस्तेही ही जाहीर केले आहेत.

------------------------
ब्रेकिंग बातम्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आम्हाला 9561617373 या नंबरला WhatsApp करा आणि लिहा “Mangalwedha Times News”

No comments:

Post a Comment