धोका वाढला : सोलापुरात कोरोनाचे नवीन सहा रुग्ण पॉझिटिव्ह आढळले - Mangalwedha Times

Breaking

Monday, April 20, 2020

धोका वाढला : सोलापुरात कोरोनाचे नवीन सहा रुग्ण पॉझिटिव्ह आढळले

मंगळवेढा टाईम्स वृत्तसेवा । सोलापूर शहरातील कोरोना  बाधीतांची संख्या आता 21 झाली आहे. जिल्हाधिकारी मिलिंद शंभरकर यांनी आज 20 एप्रिल दुपारी 12:30  वाजता ही माहिती दिली.कालपर्यंत सोलापुरात  2 मृत्यू आणि 13 जणांवर उपचार अशी एकूण कोरोना बाधीतांची  संख्या 15 होती; त्यात आज 6 रुग्णांची भर पडली.


आज बापूजी नगर, भद्रावती पेठ येथील प्रत्येकी एक तर कुर्बान हुसेन झोपडपट्टी तसेच पाच्छा पेठ येथील दोन रुग्णांचा समावेश आहे.


आत्तापर्यंत सोलापुरात कोरोना संशयित 778 जणांची ची चाचणी घेण्यात आली . 569 जणांचे अहवाल आले आहेत तर 209 जणांचे अहवाल येणे आहेत. प्राप्त 569 पैकी 548 जणांची चाचणी निगेटिव्ह आली आहे तर 21 जणांची ची चाचणी पॉझिटिव्ह आली आहे.  अशी आजवरची स्थिती आहे.


सोलापुरात आज दुपारी दोन वाजल्यापासून पूर्णपणे संचारबंदी आदेश लागू झाले आहेत. अत्यंत अत्यावश्यक सेवा वगळता इतर सर्व सेवा आता 23 एप्रिल च्या मध्यरात्रीपर्यंत बंद राहतील ,यात किराणा दुकान ,खाजगी औषध दुकान, बँका, भाजीपाला यांचाही समावेश आहे.


पेट्रोल पंपावर ही आता केवळ अत्यावश्यक सेवेतील कर्मचारी, वैद्यकिय विभागाची वाहनं यांनाच पेट्रोल मिळणार आहे .इतरांना पेट्रोल मिळणार नाही.


सोलापूरकरांनी आज पासूनच्या संचारबंदीचा अत्यंत काटेकोरपणे पालन करावं .रस्त्यावर सार्वजनिक ठिकाणी एकटे किंवा एकत्रितपणे येणे टाळावेच असे आवाहनही जिल्हाधिकारी मिलिंद शंभरकर यांनी केलं आहे.

कोरोना ची वाढती साखळी ब्रेक करण्यासाठी यापेक्षा वेगळा उपाय सध्या तरी नाही असेही ते म्हणाले.

--------------------
ब्रेकिंग बातम्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आम्हाला 9561617373 या नंबरला WhatsApp करा आणि लिहा “Mangalwedha Times News”

No comments:

Post a Comment