समाधान आवताडे यांच्या पुढाकाराने 10 हजार गरजू कुटुंबाना जीवनावश्यक वस्तूंचे किट वाटप - Mangalwedha Times

Breaking

Tuesday, April 28, 2020

समाधान आवताडे यांच्या पुढाकाराने 10 हजार गरजू कुटुंबाना जीवनावश्यक वस्तूंचे किट वाटप


समाधान फुगारे । मंगळवेढा संत दामाजी सहकारी साखर कारखाना व राष्ट्रीय कामगार संघटना (इंटक), चेअरमन समाधान आवताडे यांच्या पुढाकाराने मंगळवेढा व पंढरपूर तालुक्यातील 10 हजार गरीब व निराधार कुटुंबाना जीवनावश्यक वस्तूंचे किट वाटपाचा शुभारंभ आज मंगळवेढा येथे करण्यात आला.


यावेळी जीवनावश्यक वस्तूंचे किट उपविभागीय अधिकारी उदयसिंह भोसले,तहसीलदार स्वप्नील रावडे,उपविभागीय पोलीस अधिकारी दत्तात्रय पाटील,पोलीस निरीक्षक जोतिराम गुंजवटे, जिल्हा मध्यवर्ती बँकेचे संचालक बबनराव आवताडे, खरेद विक्री संघाचे चेअरमन सिध्देश्वर आवताडे यांच्या हस्ते वाटप करण्यात आले.


यामध्ये शेंगदाणे, तेल , साखर ,दाळ व इतर एक महिन्याचा किराणा देण्यात आला. सध्या कोरोणामुळे सगळीकडे हाहाकार माजलेला आहे. ज्यांचे पोट हातावरती आहे.अशा मजूर व गरजू कुटुंबातील लोकांची सध्या तारांबळ उडत आहे,त्यांच्या रोजीरोटीचा प्रश्न निर्माण झाला आहे. येथे अनेकांचं आयुष्य हे मोलमजुरी,उसतोडीवर चालते गावामध्ये पुरेसे काम नाही व सध्या कोरोनामुळं सर्व बंद आहे.


सध्या माणूस जगणं महत्वाचं आहे. सामाजिक भान म्हणून जितकं शक्य आहे तेवढं करायचा प्रयत्न आहे ,असे चेअरमन समाधान आवताडे यांनी सांगितलं. शिवाय दररोज लोकांना धान्य व किराणा वाटप करणार असल्याचेही आवताडे म्हणाले.

-------------------
ब्रेकिंग बातम्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आम्हाला 9561617373 या नंबरला WhatsApp करा आणि लिहा “Mangalwedha Times News”

No comments:

Post a Comment