मंगळवेढयात दोन ठिकाणी पोलिसांचे जुगार अड्डयावर छापे;18 आरोपींविरूध्द गुन्हा दाखल - Mangalwedha Times

Breaking

Friday, April 24, 2020

मंगळवेढयात दोन ठिकाणी पोलिसांचे जुगार अड्डयावर छापे;18 आरोपींविरूध्द गुन्हा दाखल


मंगळवेढा टाईम्स वृत्तसेवा । मंगळवेढा तालुक्यातील रेवेवाडी व चिक्कलगी या दोन ठिकाणी पोलिसांनी मन्ना जुगार खेळणार्‍या जुगार अड्डयावर छापे टाकून 3 लाख 63 हजार 965 रुपयांचा मुद्देमाल जप्त करून 18 आरोपींविरूध्द गुन्हा दाखल करण्यात आला आहे.


कोरोना या संसर्गजन्य आजाराला अटकाव घालण्यासाठी संपूर्ण देश लॉकडाऊन केला आहे.अशा परिस्थितीत 52 पानी मन्ना नावाचा जुगार खेळणार्‍यांची संख्या मात्र कमी होताना दिसत नाही. संचारबंदी कालावधीतही मंगळवेढा तालुक्यात गेल्या दोन दिवसात एकंदीत तीन ठिकाणी पोलिसांनी जुगार अड्डयावर छापे टाकले आहेत.


गुरुवार दि. 23 एप्रिल रोजी रेवेवाडी व चिक्कलगी शिवारात मन्ना नावाचा जुगार खेळत असल्याची गोपनीय माहिती उपविभागीय पोलिस अधिकारी दत्तात्रय पाटील यांना मिळताच त्यांनी पोलिस निरिक्षक जोतीराम गुंजवटे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिसांनी या दोन ठिकाणी छापे टाकून 3 लाख 63 हजार 965 रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त केला.यामध्ये प्रामुख्याने मोठया प्रमाणात मोटर सायकली जप्त करण्यात आल्या आहेत.


या प्रकरणी म्हाळाप्पा आप्पा लवटे,नारायण नामदेव लवटे,ब्रम्हदेव चिंंतू पुजारी,शंकर म्हाळाप्पा धुलगुडे,विलास बिरा धुलगुडे,धनाजी शिवाजी लवटे (सर्व रा.रेवेवाडी) तसेच अशोक सखाराम कांबळे (रा.रड्डे),दिलीप तातोबा मेटकरी,सिध्दमला कांताप्पा बिराजदार(रा. चिक्कलगी),दादासोा मारुती कांबळे,सत्यवान विठ्ठल अलदर,महादेव दर्‍याप्पा बिराजदार,भिवा रामगुंड मासाळ,सिध्दा तुकाराम मेटकरी,बलभिम लक्ष्मण कांबळे,अंबादास बाळू थोरबोले,पोपट नामदेव खडतरे,वसंत सखाराम कांबळे यांच्याविरूध्द आपत्ती व्यवस्थापन कायदा व मुंबई जुगार कायदयाप्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे.


याची  फिर्याद पोलिस शिपाई निशिकांत येळे व अजित मिसाळ यांनी दिली आहे.

------------------------
ब्रेकिंग बातम्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आम्हाला 9561617373 या नंबरला WhatsApp करा आणि लिहा “Mangalwedha Times News”

No comments:

Post a Comment