मंगळवेढ्यात जुगार अड्डयावर पोलिसांचा छापा ; १३ जणांवर गुन्हा दाखल - Mangalwedha Times

Breaking

Thursday, April 23, 2020

मंगळवेढ्यात जुगार अड्डयावर पोलिसांचा छापा ; १३ जणांवर गुन्हा दाखल

मंगळवेढा टाईम्स वृत्तसेवा । गोणेवाडी (ता.मंगळवेढा) येथे शेतामध्ये सोशल डिस्टन्सींग न ठेवता गोलाकार बसून मन्ना नावाचा जुगार खेळणाऱ्या आड्ड्यावर पोलिसांनी छापा टाकून २ लाख ३० हजारांचा मुद्देमाल जप्त करून १३ जणांविरूध्द आपत्ती व्यवस्थापन कायदा व साथीचे रोग प्रतिबंधक कायदा,जुगार कायदा अंतर्गत गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.


पोलिस सुत्रांनी दिलेली माहिती अशी,गोणेवाडी येथे विठ्ठल गुंगे यांच्या शेतात मन्ना नावाचा जुगार अड्डा चालत असल्याची गोपनीय माहिती उपविभागीय पोलीस अधिकारी दत्तात्रय पाटील यांना मिळाली. बुधवार दि.२२ एप्रिल रोजी दुपारी १.३० वा. सहाय्यक फौजदार दत्तात्रय तोंडले, पोलिस हवालदार राजेंद्र जावळे,पोलिस नाईक सुनिल मोरे,पोलिस शिपाई साळुखे आदींनी मोटर सायकलवर तीन गट तयार करून शेतात छुप्या मार्गाने पायी चालत जावून जुगार अड्डयावर छापा टाकला असता.


यावेळी आरोपी शंकेश्वर जयराम मासाळ,बापू अंबादास मासाळ, सत्यवान दादा गुंगे,नंदकुमार भिमा गवळी,रामचंद्र जिजाराम हजारे,शहाजी दिलीप साळुखे,वाल्मिक झांबर कसबे,अशोक निवृत्ती चव्हाण,समाधान रखमाजी गरंडे,बाळू विठ्ठल हजारे,जगन रामू मोरे,बजरंग मच्छिंद्र चव्हाण (सर्व रा.गोणेवाडी), तानाजी भानूदास कांबळे (रा.नंदेश्वर) आदी १३ जण कोणतेही सोशल डिस्टन्सींग न पाळता गोलाकार बसून ५२ पानी मन्ना जुगार खेळत असल्याचे पोलिसांच्या निदर्शनास आले.


पोलिसांनी जुगार अड्डयातून चलनी नोटा, मोबाईल हँडसेट, मोटर सायकल असा एकूण २ लाख ३० हजार ३३५ रुपयांचा मद्देमाल पोलिसांनी जप्त केला आहे.


सध्या सर्व देशभरात व राज्यात कोरोना कोवीड १९ चा प्रादुर्भाव व प्रसार होवू नये म्हणून सोलापूरचे जिल्हाधिकारी मिलिंद शंभरकर यांनी संचारबंदी पुकारली असतानाही सर्व नियम धाब्यावर बसवून वरील १३ जण जुगार खेळत होते. याची फिर्याद पोलिस शिपाई मनोहर भोसले यांनी दिल्यावर वरील तेरा जणांविरूध्द गुन्हा दाखल करण्यात आला. याचा अधिक तपास पोलिस नाईक दत्तात्रय येलपले करीत आहेत.

----------------------
ब्रेकिंग बातम्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आम्हाला 9561617373 या नंबरला WhatsApp करा आणि लिहा “Mangalwedha Times News”

No comments:

Post a Comment