पोलीस दणका : जुगार अड्डयावर पोलिसांचा छापा 11 जणांविरूध्द गुन्हे दाखल ; आत्तापर्यंत तीन छापे - Mangalwedha Times

Breaking

Monday, April 27, 2020

पोलीस दणका : जुगार अड्डयावर पोलिसांचा छापा 11 जणांविरूध्द गुन्हे दाखल ; आत्तापर्यंत तीन छापेमंगळवेढा टाईम्स वृत्तसेवा । घरनिकी येथे मन्ना नावाचा जुगार खेळणार्‍या अड्डयावर पोलिसांनी छापा टाकून जवळपास 1 लाख 45 हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करून 11 जणांविरूध्द गुन्हे दाखल केले आहेत. दरम्यान,चालू आठवडयात पोलिसांनी तीन ठिकाणी जुगार अड्डयावर छापे मारून 5 लाख 20 हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे.


घरनिकी येथे मन्ना नावाचा जुगार खेळत असल्याची गोपनीय माहिती उपविभागीय पोलीस अधिकारी दत्तात्रय पाटील यांना प्राप्त झाली.पोलिस निरिक्षक जोतीराम गुंजवटे यांना कारवाईच्या सूचना दिल्यानंतर त्यांनी पोलिसांच्या मदतीने दि. 26 रोजी 3.30 वा. छापा टाकला.


यावेळी श्रीकांत अर्जून जाधव,सुरेश सुखदेव गोडसे,सिध्देश्‍वर शिवाजी जाधव (रा.सिध्देवाडी),चांद हजरत मुलाणी,आबासाहेब उत्तम क्षिरसागर,आण्णासाो शिवाजी मोरे,शरद भारत क्षीरसागर,(सर्व रा. घरनिकी),पांडुरंग ज्ञानेश्‍वर रायबान (रा.शरदनगर),रोहिदास हरीदास मेटकरी (रा.ढेकळेवाडी), अरूण रामचंद्र मुरडे (रा.कारखाना रोड,मंगळवेढा),भारत रणदिवे (रा.तावशी ) आदी 11 आरोपी गोलाकार बसून 52 पानी मन्ना नावाचा जुगार पैशावर खेळत असल्याचे निदर्शनास आले.


पोलिसांनी या छाप्यात मोबाईल,मोटर सायकली असा एकूण 1 लाख 45 हजार 150 रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे.डी.वाय.एस.पी.दत्तात्रय पाटील यांनी लॉकडाऊनमध्ये अवैध धंदयावर छापे टाकण्याची मोहिम हाती घेतली आहे. आत्तापर्यंत तीन जुगार अड्डयावर छापे टाकून 5 लाख 20 हजाराचा मुद्देमाल जप्त केला आहे.


दरम्यान या कारवाईमुळे जुगार खेळणार्‍यांमध्ये खळबळ उडाली आहे.ही मोहिम पुढेही अशीच चालू राहणार असल्याचे पोलिस सुत्रांकडून सांगण्यात आले.


या जुगाराची फिर्याद पोलिस नाईक मनोहर भोसले यांनी दिल्यानंतर 11 आरोपीविरूध्द जुगार कायदा कलम 12 - अ/ व आपत्ती व्यवस्थापन कायदयानुसार गुन्हा नोंदविण्यात आला आहे.आरोपी भारत रणदिवे हा मक्याच्या पिकाचा फायदा घेवून पळून जाण्यात यशस्वी ठरला असून पोलिस त्याचा कसून शोध घेत आहेत.
-----------------
ब्रेकिंग बातम्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आम्हाला 9561617373 या नंबरला WhatsApp करा आणि लिहा “Mangalwedha Times News”

No comments:

Post a Comment