मुंबईहून आलेला 'पोलिस कर्मचारी' इन्स्टीटयुशनल क्वारंटाईनमध्ये ; अनेक रस्ते बंद - Mangalwedha Times

Breaking

Monday, April 27, 2020

मुंबईहून आलेला 'पोलिस कर्मचारी' इन्स्टीटयुशनल क्वारंटाईनमध्ये ; अनेक रस्ते बंदमंगळवेढा टाईम्स ऑनलाईन । मुंबई  येथे कार्यरत असलेला पोलिस कर्मचारी मंगळवेढयात आल्याने त्याची ग्रामीण रुग्णालयात तपासणी करून शहरालगत असलेल्या मुलींच्या वसतीगृहात इन्स्टीटयुशनल क्वारंटाईन करण्यात आले आहे. 


मूळचा मंगळवेढा तालुक्यातील असलेला पोलिस कर्मचारी मुंबई येथे सेेवेत असून तो नुकताच मंगळवेढा येथे आला आहे. त्या पोलिस कर्मचार्‍याचे मंगळवेढा ग्रामीण रुग्णालयात तपासणी करून शहरालगत असलेल्या मुलींच्या वसतीगृहात इन्स्टीटयुशनल क्वारंटाईन करण्यात आले आहे. 


या वसतीगृहात पोलिस कर्मचार्‍याबरोबर अन्य सात जण ठेवण्यात आले आहेत. तर मंगळवेढा शहरात 15 जण बाहेरून आल्याने त्यांना होम क्वारंटाईन त्यांच्या घरी करण्यात आल्याचे वैद्यकीय सुत्रांकडून सांगण्यात आले.मंगळवेढा तालुका सीमेलगत असलेल्या घेरडी येथे एकजण पॉझिटिव्ह सापडल्याने मंगळवेढा तालुक्यातील प्रशासन व नागरिक अलर्ट झाले आहेत.


अनेक गावामधून ग्रामस्थांनी कोरोना संसर्गजन्यला रोखण्यासाठी रस्त्यावर काठाडया,मातीचे बांध,चार,सिमेट पाईप,बांबू-वासे आदींनी रस्ते रोखले आहेत.सोलापूर शहरात रुग्ण वाढत असल्याने जिल्हयाच्या ग्रामीण भागात नागरिक चिंतामय बनले असून प्रत्येकजण वैयक्तिक खबरदारी घेत आहेत.

-----------------
ब्रेकिंग बातम्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आम्हाला 9561617373 या नंबरला WhatsApp करा आणि लिहा “Mangalwedha Times News”

No comments:

Post a Comment