मुंबईहून मंगळवेढयात आलेला 'ताे' व्यक्ती "विलगीकरण कक्षात" दाखल - Mangalwedha Times

Breaking

Sunday, April 26, 2020

मुंबईहून मंगळवेढयात आलेला 'ताे' व्यक्ती "विलगीकरण कक्षात" दाखल


मंगळवेढा टाईम्स ऑनलाईन । मुंबई येथून आलेला एक व्यक्ती जालिहाळ गावात आल्यानंतर ग्रामस्थांनी आरोग्य विभागाला कळविल्यानंतर त्याची आरोग्य तपासणी करून त्याला जि.प. शाळेत विलगीकरण कक्षात ठेवण्यात आले.जालिहाळ येथील एक तरूण मुंबईत गार्ड म्हणून कार्यरत आहे.तो दि. 23 रोजी त्याच्या मूळ जालिहाळ गावी मुंबईहून आला होता. तो पोलिस मुंबईहून आल्याचे वृत्त जालिहाळ पंचक्रोशीत पसरताच ग्रामस्थांनी याबाबतची माहिती मरवडेतील प्राथमिक आरोग्य केंद्राला दिली.आरोग्य विभागाच्या कर्मचार्‍यानी त्या पोलिसाला ताब्यात घेवून प्राथमिक केंद्रात तपासणी केली.तदनंतर जालिहाळ गावातील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेतील विलगीकरण कक्षात ठेवण्यात आले असून 14 दिवसानंतर पुन्हा तपासणी करण्यात येणार असल्याचे आरोग्य विभागाकडून सांगण्यात आले.

---------------------
ब्रेकिंग बातम्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आम्हाला 9561617373 या नंबरला WhatsApp करा आणि लिहा “Mangalwedha Times News”

No comments:

Post a Comment