पंतप्रधान मोदींनी 'या' चिमुकळ्यांचा Video केला शेअर; फक्त एका मिनिटांत कसा पसरतो 'कोरोना' पाहा - Mangalwedha Times

Breaking

Thursday, April 16, 2020

पंतप्रधान मोदींनी 'या' चिमुकळ्यांचा Video केला शेअर; फक्त एका मिनिटांत कसा पसरतो 'कोरोना' पाहा


मंगळवेढा टाईम्स वृत्तसेवा । देशात करोना व्हायरसने थैमान घातलं आहे. जवळपास 12 हजारापेक्षा अधिक जणांना कोरोनाची लागण झाली आहे. तर महाराष्ट्रात कोरोना बाधितांचा आकडा 3 हजाराच्या वर गेला आहे. देशात अत्यावश्यक सेवा वगळता बाहेर जाऊन नये असे वारंवार आवाहन करूनही अनेक ठिकाणी लॉकडाऊन गांभीर्यानं पळला जात नसल्याचे लक्षात येत आहे. अशा ठिकाणी पोलिसांकडून कठोर कारवाई केली जात आहे.देशातील कोरोना प्रादुर्भाव रोखायचा असेल आणि कोरोना विरुद्धची लढाई जिंकायची असेल तर लोकांनी घरात सुरक्षित राहून लढले पाहिजे. या युद्धामध्ये संयम आणि सुरक्षित घरा राहून कोरोनाचा पराभव करून जिंकता येणार असं आवाहन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केले आहे.हा कोरोना व्हायरस इतक्या झपाट्याने पसरतो कसा असा प्रश्न अनेकांना पडला असेल. त्याचं साधा सोपं उत्तर खरंतर चिमुरड्यांनी दिलं आहे.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आपल्या ट्वीटरवर एक व्हिडिओ शेअर केला आहे. हा व्हिडिओ सध्या तुफान व्हायरल होत आहे. खेळत असताना त्या खेळातून कोरोना संदर्भात जनजागृती निर्माण करण्याचं काम या मुलांनी केलं आहे. साध्या सोप्या शब्दात कोरोना कसा पसरतो आणि ती साखळी तोडायची असेल तर काय करायला हवं हे त्यांनी खेळाच्या माध्यमातून दाखवून दिलं आहे. या लहान मुलांचे सोशल मीडियातून मोठ्या प्रमाणात कौतुक होत आहे. सोशल मीडियात हा व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर 169.5 हजार लोकांनी पहिला असून 9 हजार युजर्सनी रिट्विट केला आहे. तर 1 हजाराहून अधिक लोकांनी त्यावर कमेंट्स केल्या आहेत. 43 हजार जणांनी या व्हिडिओला लाईक केलं आहे.


----------
ब्रेकिंग बातम्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आम्हाला 9561617373 या नंबरला WhatsApp करा आणि लिहा "मंगळवेढा टाईम्स News"


No comments:

Post a Comment