मंगळवेढ्यात जुगार अड्ड्यावर धाडीचे सत्र सुरू ; 'या' गावातील नऊ जणांवर गुन्हा - Mangalwedha Times

Breaking

Thursday, April 30, 2020

मंगळवेढ्यात जुगार अड्ड्यावर धाडीचे सत्र सुरू ; 'या' गावातील नऊ जणांवर गुन्हा


मंगळवेढा टाईम्स ऑनलाईन । कोरोना साथीचा प्रादुर्भाव लक्षात घेऊन सरकारने जमावबंदीचा आदेश दिला आहे. तरी आदेशाचा भंग करून तालुक्यातील पौट येथे या आदेशाचा भंग करून सुरू असलेल्या जुगार अड्ड्यावर धाड टाकून रोख रक्कम, मोबाईल, दुचाकीसह एक लाख 80 हजार 730 रुपयांचा ऐवज हस्तगत करून नऊ जणांवर गुन्हा दाखल झाला. 


कोरोना व्हायरच्या भीषण साथीत पोलिसांचे जुगार अड्ड्यावर धाडसत्र कायम राहिले. यावर नागरिकामध्ये गांभीर्य नसल्याचे दिसून येत आहे.


उपविभागीय पोलिस अधिकारी दत्तात्रय पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली कार्यान्वित पथकाने पौट शिवारात बंडू बिराप्पा भोरकडे यांच्या शेतातील लिंबाच्या झाडाखाली जुगाराचा अड्डा सुरू असल्याची माहिती गोपनीय मिळाली होती.
धाड टाकली असता त्यामधील नऊ जण जुगार खेळत असल्याचे आढळून आले. 

परंतु पोलिसांची कुणकुण लागल्यावर दोघे पळून जाण्यात यशस्वी ठरले. याची फिर्याद पोलिस कॉन्स्टीबल बालाजी रेड्डी यांनी दिली. यात संजय महादेव निमगिरे, नंदू यशवंत सांगोलकर, रणजित महादेव निमगिरे, संजय सुखदेव कत्ते, विष्णू बबन सांगोलकर, दिलीप बाबासाहेब सांगोलकर, मर्याप्पा गोपाळ निमगिरे हे जागीच सापडले. सिद्धेश्वर तातोबा नरळे व संतोष सुखदेव पाटील फरार झाले.

त्यांच्याकडे रोख रक्कम, मोबाईल, वेगवेगळ्या कंपनीच्या दुचाकी असा एक लाख 80 हजार 730 रुपयांचा ऐवज पोलिसांनी ताब्यात घेतला.

--------------------------
ब्रेकिंगनवनवीन ताज्या घडामोडी मोबाईलवर मिळवण्यासाठी आम्हाला 95 6161 7373 या नंबरला WhatsApp करा आणि लिहा “Mangalwedha Times News”

No comments:

Post a Comment