भीमा नदीच्या पात्रात पोहण्यासाठी गेलेला तरुण बेपत्ता; दिवसभरातील दुसरी घटना - Mangalwedha Times

Breaking

Sunday, April 19, 2020

भीमा नदीच्या पात्रात पोहण्यासाठी गेलेला तरुण बेपत्ता; दिवसभरातील दुसरी घटना

मंगळवेढा टाईम्स वृत्तसेवा । पंढरपूर तालुक्यातील चळे येथील सुमित बंडू वाघमारे(वय.23) हा तरुणाचा त्याच्या मित्रांसमवेत भिमा नदीत पदुबाई मंदिराजवळ पोहायला गेला होता.तो तेथून बेपत्ता झाला आहे.


याबाबत सविस्तर माहिती अशी की, ही घटना आज दुपारी 1वाजण्याच्या सुमारास घडली.गावातील युवक होड्या घेऊन त्याला शोध घेण्याचा प्रयत्न करत होते पण पाण्याचा वेग जास्त असल्यामुळे शोध कार्यात अडथळा निर्माण झाला आहे.


दरम्यान आज सकाळीच पंढरपूर तालुक्यातील भोसे येथील दोन मुली बंधाऱ्यातील पाण्यात कपडे धुण्यासाठी गेल्या होत्या.मात्र त्या पाय घसरल्याने त्या बंधाऱ्यातील पाण्यात पडल्या.त्यापैकी एकीचा मृतदेह पाण्यातून बाहेर काढण्यात आला आहे.तर दुसरीचा शोध सुरु असताना ही दुसरी घटना घडली आहे.

--------------------
ब्रेकिंग बातम्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आम्हाला 9561617373 या नंबरला WhatsApp करा आणि लिहा “Mangalwedha Times News”

No comments:

Post a Comment