Breaking : देशात 3 मेपर्यंत लॉकडाऊन कायम राहणार ; पंतप्रधान मोदींची मोठी घोषणा - Mangalwedha Times

Breaking

Tuesday, April 14, 2020

Breaking : देशात 3 मेपर्यंत लॉकडाऊन कायम राहणार ; पंतप्रधान मोदींची मोठी घोषणासमाधान फुगारे । मंगळवेढा टाईम्स वृत्तसेवा । देशात लागू असलेला ३ मेपर्यंत वाढवत असल्याची मोठी घोषणा पंतप्रधान मोदींनी केली आहे. राज्य सरकारांनी, स्थानिक स्वराज्य संस्थांनी उत्तम काम केलं आहे. प्रत्येकानं जबाबदारी ओळखून योगदान दिलं आहे. मात्र तरीही कोरोना पसरतो आहे. कमीत कमी नुकसान व्हावं, लोकांच्या अडचणी कमी करण्यासाठी राज्यांसोबत चर्चा केली. काही राज्यांनी लॉकडाऊन वाढवण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे ३ मेपर्यंत लॉकडाऊन वाढवण्याचा निर्णय केंद्र सरकारनं घेतल्याची घोषणा मोदींनी केली.


कोरोनाचा प्रादुर्भाव अख्ख्या जगात झाला आहे.भारताची इतर देशापेक्षा चांगली परस्थिती असून भारतात 3 मेपर्यंत लॉकडाऊन कायम राहणार असल्याचे पंतप्रधान नरेंद्र मोदींनी देशाला संबोधित करताना सांगितले.ते म्हणाले, 20 एप्रिल पर्यंत सर्व राज्यांचे मुल्यांकन होईल नंतरच काय सुरू करता येईल का याचा निर्णय घेतला जाईल.सोशल डिस्टंन्सिंग आणि लॉकडाऊनचा भारताला मोठा फायदा झाला आहे.त्यामुळे नागरिकांनी आपली काळजी घेणे गरजेचे आहे. भारताची परिस्थिती आजही इतर देशांच्या मानाने सावरल्यासारखी आहे.


भारताने वेळेत निर्णय घेतले नसते तर भारताची स्थिती काय असती याचा विचार करु शकत नाही.भारताने समस्या वाढण्याआधीच उपाय-योजना सुरु केल्या त्यामुळे आपण वेळेतच सावध पाऊले उचलली.पंतप्रधान नरेंद्र मोदींकडून बाबासाहेबांचं स्मरण करून देशाला संबोधित करण्यास सुरुवात केली.देशासाठी सर्व जण आपलं कर्तव्य पार पाडत आहेत कोरोनाशी भारतीयांची लढाई सुरु आहे.घरातील वृद्धांची अधिक काळजी घ्या, आरोग्य मोबाईल सेतू अॅप डाऊनलोड करा असे त्यांनी सांगितले.

-------------
ब्रेकिंग बातम्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आम्हाला 95 6161 7373 या नंबरला WhatsApp करा आणि लिहा “Mangalwedha Times News”

No comments:

Post a Comment