लॉकडाऊन २० एप्रिल नंतर शिथिल ; ढाबे वाहतुकीला देखील परवानगी, वाचा सविस्तर - Mangalwedha Times

Breaking

Thursday, April 16, 2020

लॉकडाऊन २० एप्रिल नंतर शिथिल ; ढाबे वाहतुकीला देखील परवानगी, वाचा सविस्तरमंगळवेढा टाईम्स वृत्तसेवा । केंद्र सरकारने लॉकडाऊन वाढवल्या नंतर सुधारित मर्गदर्शक सूचना ही नव्याने जारी करण्यात आल्या आहेत. त्यानुसार विविध सेवा पुरवणाऱ्या मालवाहू ट्रक वाहतुकीला ही २० एप्रिल नंतर परवानगी देण्यात आली आहे. लॉकडाऊनच्या नियमांनुसार आता पर्यंत फक्त अत्यावश्यक सेवा वाहतुकीस परवानगी होती.


परंतू सुधारित नियमावलीत सर्व प्रकारच्या ट्रक मालवाहतुकीस ही परवानगी देण्यात आली आहे. हायवे वरील ढाबे व गॅरेज यांना ही सुरु करण्याची परवानगी शासनाने दिली आहे. त्यामुळे रस्त्याने प्रवास करणाऱ्या चालकांची जेवणाची सोय उपलब्ध होईल.


अचानक आलेल्या या संकटामूळे मालवाहतुकदार व ट्रक मालक संकटात सापडले आहेत.
त्यांना असणारे बँकांचे हप्ते लक्षात घेता वाहतुकी साठी परवानगी देण्यात यावी ही मागणी वाहतूक दार संघटनांनी केली होती.
दरम्यान 11 एप्रिल पूर्वी सोलापूर जिल्हा ग्रीन झोन मध्ये असल्याचे सांगितले जात होते त्यावेळी सोलापूर जिल्ह्यात एकही कोरोना रुग्ण आढळला नव्हता कालपर्यंत जिल्ह्यात दोन रुग्ण असल्याचे स्पष्ट झाले आहे. त्यामुळे सोलापूर जिल्ह्यासाठी लॉकडाउन शिथिल होणार का ? हा प्रश्न निर्माण झाला आहे.
 ----------
ब्रेकिंग बातम्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आम्हाला 9561617373 या नंबरला WhatsApp करा आणि लिहा

No comments:

Post a Comment