मंगळवेढ्यात शुक्रवारपासून सलग तीन दिवस “जनता कर्फ्यू’ - Mangalwedha Times

Breaking

Thursday, April 23, 2020

मंगळवेढ्यात शुक्रवारपासून सलग तीन दिवस “जनता कर्फ्यू’


समाधान फुगारे । मंगळवेढा
मंगळवेढा तालुक्‍यात कोरोनाचा शिरकावच होऊ नये यासाठी संत दामाजी नगर व संत चोखामेळा नगर ग्रामपंचायत व नगरपालिका पदाधिकाऱ्यांनी नागरिकांना शुक्रवार ता. 24 एप्रिल ते रविवार ता. 26 एप्रिल या तीन दिवसासाठी जनता कर्फ्यू पाळण्याचे आवाहन केले आहे.


नागरिकांच्या हितासाठीच असलेल्या या कालावधीसाठी सर्व नागरिकांनी स्वयंस्फूर्तीचा जनता कर्फ्यूमध्ये सहभागी व्हावे. तसेच कुणीही या कालावधीत घराबाहेर पडू नयेत. या काळात फक्‍त दवाखाने, औषध दुकाने व सकाळी दूध विक्री या अत्यावश्‍यक सेवा सुरू राहतील. बाकी सर्व व्यवहार बंद ठेवण्यात येणार असल्याचे नगरपालिका पदाधिकाऱ्यांच्या वतीने काढण्यात आलेल्या प्रसिद्धी पत्रकाद्वारे जाहीर करण्यात आले आहे.


सोलापूर येथे कोरोना रुग्ण मोठ्या प्रमाणावर आढळत असताना मंगळवेढा मध्ये मात्र जराही गांभीर्य नसल्याची परिस्थिती निर्माण झाली होती. तालुक्‍यातील सुमारे 20 टक्के नागरिकांचा कायम रस्त्यावर वावर होता. दुकाने व भाजीपाला, मंडई व इतर ठिकाणी सोशल डिस्टन्सचा फज्जा उडाला होता.


या मोकाट फिरणाऱ्या लोकांना फक्त धुलाईचीच भाषा कळते आणि पोलिसांनी ती वापरावी, अशीही मागणी सुज्ञ नागरिकांमधून होत होती. अखेर सध्याच्या परिस्थितीमध्ये गरजेचा असलेली जनता कर्फ्यू तीन दिवस लागू केल्याने सामान्य नागरिकांनी तूर्त सुटकेचा निश्वास टाकला आहे.

----------------------
ब्रेकिंग बातम्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आम्हाला 9561617373 या नंबरला WhatsApp करा आणि लिहा “Mangalwedha Times News”

No comments:

Post a Comment