चिंता वाढली : सोलापुरात 'या' भागात वाढले 21 पॉझिटिव्ह रुग्ण ! - Mangalwedha Times

Breaking

Thursday, April 30, 2020

चिंता वाढली : सोलापुरात 'या' भागात वाढले 21 पॉझिटिव्ह रुग्ण !


मंगळवेढा टाईम्स वृत्तसेवा । सोलापुरात आज कोरोना पॉझिटिव्ह रुग्णांची संख्या १०२ झाली आहे . गुरुवारी दिवसभरात सोलापुरातील जुन्याच ७ हॉटस्पॉट भागात २१ रुग्ण कोरोना पॉझिटिव्ह आढळले आहेत . त्यात १४ पुरुष व ७ महिलांचा समावेश आहे , अशी माहिती प्रशासनाने गुरुवारी दिली.


सोलापुरात कोरोना रुग्णांची संख्या वरचेवर वाढतच चालल्यामुळे चिंता वाढली आहे . बुधवारी १३ तर गुरुवारी २१ रुग्ण आढळले . विशेष धक्कादायक बाब म्हणजे यात ७ ते १२ या वयोगटातील सात मुले आहेत . शहरातील हॉटस्पॉटमध्येच हे रुग्ण आढळले आहेत.


यामध्ये शास्त्री नगरमध्ये : ९ , उत्तर सदर बझार . १ , कुर्बान हुसेन नगरः२ , नई जिंदगी : ३ , शनिवार पेठः१ , - शानदार चौक आणि मोदी : ४ अशी रुग्णसंख्या आहे . शास्त्री नगर , मोदी . नई जिंदगी आणि कुबनि हुसेन नगरात रुग्ण वाढत असल्याचे दिसून येत आहे.


नव्याने आढळलेले हे रुग्ण पूर्वीच्या रुग्णांच्या संपर्कात आल्याने त्यांना क्वारंटाइन करण्यात आले होते . या ठिकाणी त्यांचे स्वब घेतल्यावर पॉझिटिव्ह आले आहेत . त्यामुळे त्यांना आता उपचारासाठी आयसोलेशनमध्ये हलविण्यात आले आहे.


संपर्कातील व्यक्तींना लागण यापूर्वी पॉझिटिव्ह रुग्ण आढळलेल्या ठिकाणच्या व्यक्तींना केगाव येथील निरीक्षण कक्षात दाखल करण्यात आले आहे . त्यातील २० व्यक्तींचा अहवाल पॉझिटिव्ह आला आहे , तर एक शास्त्री नगरातील तरुण उपचारासाठी रुग्णालयात दाखल झाल्यावर पॉझिटिव्ह आला आहे.

--------------------
ब्रेकिंगनवनवीन ताज्या घडामोडी मोबाईलवर मिळवण्यासाठी आम्हाला 9561617373 या नंबरला WhatsApp करा आणि लिहा “Mangalwedha Times News”

No comments:

Post a Comment