खरी बातमी : सोलापुरात कोरोनाचे ८२ नव्हे ६८ च रुग्ण : जिल्हाधिकारी शंभरकर - Mangalwedha Times

Breaking

Wednesday, April 29, 2020

खरी बातमी : सोलापुरात कोरोनाचे ८२ नव्हे ६८ च रुग्ण : जिल्हाधिकारी शंभरकर

मंगळवेढा टाईम्स वृत्तसेवा । सोलापुरात कोटोनाग्रस्तांची संख्या 68 असून त्यापैकी सहाजणांचा मृत्यू झाला आहे आणि काल दिलेली हीच आकडेवारी खरी आहे.दरम्यान सोलापुरात कोटोना पॉझिटीव्ह 82 असल्याचे एकात्मिक रोग सर्वेक्षण कार्यक्रम या सार्वजनिक आरोग्य विभागाच्या राज्य शासनाच्या प्रेस नोटमध्ये नमूद करण्यात आलेली आकडेवाटी चुकीची असून संबंधित विभागाला आकडेवारी दुरुस्त करण्याचे आदेश देण्यात आले असल्याचे जिल्हाधिकारी मिलिंद शंभरकर यांनी सांगितले. 


सोलापुरात कोटोनाग्रस्तांची संख्या हळूहळू वाढत चालले आहे.12 तारखेला एक रुग्ण असणाऱ्या सोलापुरात आता 68 कोटोनाग्रस्ताची संख्या झाली आहे.दरम्यान बुधवारी एकात्मिक टोग सर्वेक्षण कार्यक्रमाकडून प्रसिद्ध झालेल्या आकडेवाटीत सोलापूर शहरात 75 आणि ग्रामीण भागात 7 असे 82 रुग्ण दाखवण्यात आले आहेत.व 5 जण मरण पावले अशी नोंद आहे. कोटोनाग्रस्तांची संख्या 82 वर गेल्याची चर्चा सुरु होती.

हे आकडे चुकीचे असून सोलापुरात कोरोनाचे 68 रुग्ण आहेत. मी काल मंगळवारी जाहीर केलेली आकडेवारी बरोबर आहे , आरोग्य विभागाने दिलेली आकडेवारी चुकली आहे . मी आरोग्य विभागाच्या संचालिका अर्चना पाटील यांच्याशी बोललो आहे. अर्ध्या तासात हे आकडे दुरुस्त करण्याचे त्यांनी मला सांगितले आहे.- मिलिंद शंभरकर,जिल्हाधिकारी

काही राजकारणी मंडळींनी ही फेसबुक , व्हाट्सअप, सोशल मीडियावर आकडेवाटी टाकली होती. त्यामुळे सोलापूर शहरात व ग्रामीण भागात भीतीचे व संभ्रमाचे वातावरण पसरले होते.


सोलापूर शहरात 75 आणि ग्रामीण भागात 7 असे 82 रुग्ण दाखवण्यात आले आहेत . व 5 जण मरण पावले अशी नोंद एकात्मिक टोग सर्वेक्षण मध्ये आहे. कोरोनाग्रस्तांची संख्या सर्वेक्षण मध्ये आहे. कोटोनाग्रस्तांची संख्या 82 वर गेल्याची चर्चा सोशल मीडियावर सूरू आहे. नागरिक पोलीस , जिल्हा प्रशासन , फोन करुन विचारपूस कटीत आहेत. दरम्यान मिलिंद शंभरकर यांनी ही आकडेवाटी खोटी असल्याचे सांगितले.


सोलापूर शहर जिल्ह्यातील कोरोना रुग्णांची संख्या 68 असून त्यापैकी सहा जणांचा मृत्यू झाला आहे . उर्वरित 62 जणांवर सोलापूरच्या सिव्हिल हॉस्पिटलमध्ये उपचार सुरु आहे. हीच आकडेवारी खरी असल्याचे स्पष्ट केले.वेगवेगळ्या आकडेवारीमुळे प्रशासनात योग्य समन्वय आहे का नाही ? अशी संमिश्र चर्चा सोलापूरकरांमध्ये सुरू आहे.

---------------------

ब्रेकिंग बातम्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आम्हाला 9561617373 या नंबरला WhatsApp करा आणि लिहा “Mangalwedha Times News”

No comments:

Post a Comment