CoronaVirus : पंढरपूरातील 'त्या' 47 जणांत मंगळवेढ्याचे 11 जण - Mangalwedha Times

Breaking

Wednesday, April 29, 2020

CoronaVirus : पंढरपूरातील 'त्या' 47 जणांत मंगळवेढ्याचे 11 जण


मंगळवेढा टाईम्स वृत्तसेवा । पंढरपूर येथील एका हॉस्पिटलमध्ये प्रसूती झालेल्या मोहोळ तालुक्यातील महिलेचा कोरोना रिपोर्ट पॉझिटिव्ह आल्यामुळे तिच्या संपर्कात आलेल्या ४७ जणांचे स्वॅब आज घेण्यात आले . यापूर्वी अशा प्रकारचे स्वॅब घेण्यासाठी संबंधितांना सोलापूर येथे पाठवले जात होते.परंतु आज प्रथमच येथील उपजिल्हा रुग्णालयातील टीमने हे काम केले असून त्या हॉस्पिटलमध्ये मंगळवेढा तालुक्यातील 11 जण उपचार घेत असल्याची माहिती समोर आली आहे.


मोहोळ तालुक्यातील पेनूर येथील एका महिलेची पंढरपुरातील हॉस्पिटलमध्ये प्रसूती झाली होती. त्यानंतर संबंधित महिलेचा कोरोना रिपोर्ट पॉझिटिव्ह आल्यामुळे खळबळ उडाली होती . प्रशासनाने तातडीने संबंधित हॉस्पिटलशी संपर्क साधून त्या महिलेच्या संपर्कात आलेले डॉक्टर , नर्स आणि अन्य व्यक्तींची यादी तयार केली आणि त्या सर्वांना क्वारंटाइन करण्यात आले आहे.दरम्यान , कोरोना रुग्णाच्या संपर्कात आल्यानंतर पाच दिवसांनी स्वॅब घेतल्यास नेमका रिपोर्ट मिळतो त्यामुळे या सर्व ४७ जणांचे स्वॅब काल घेण्याचा निर्णय झाला होता. यापूर्वी संबंधित लोकांना टेस्टसाठी सोलापूर येथे पाठवले जात होते.
आज प्रथमच येथील उपजिल्हा रुग्णालयाच्या अधीक्षिका डॉ.जयश्री ढवळे आणि त्यांच्या टीमने संबंधित लोकांचे स्वॅब घेतले. हे सर्व नमने सोलापूर येथे पाठवण्यात येणार आहेत.


मोहोळ तालुक्यातील पेनूर येथील कोरोनाबाधित महिला आणि तिच्या बाळावर सध्या सोलापूर येथे उपचार सरू आहेत. दोघांचीही प्रकती साधारण असल्याचे वैद्यकीय सूत्रांनी सांगितले. दरम्यान , पंढरपूरमधील उपजिल्हा रुग्णालयातील वैद्यकीय टीमने संबंधित महिलेच्या संपर्कात आलेल्या लोकांचे स्वॅब काल घेतले आहेत दोन दिवसांमध्ये या सर्वांच्या टेस्टचा अहवाल अपेक्षित आहे, अशी माहिती प्रांताधिकारी सचिन ढोले यांनी दिली.

--------------------------
ब्रेकिंग बातम्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आम्हाला 9561617373 या नंबरला WhatsApp करा आणि लिहा “Mangalwedha Times News”

No comments:

Post a Comment