#CoronaUpdate : सोलापुरकरांना तूर्त दिलासा ; 214 जणांचे कोरोना रिपोर्ट प्रतीक्षेत - Mangalwedha Times

Breaking

Saturday, April 18, 2020

#CoronaUpdate : सोलापुरकरांना तूर्त दिलासा ; 214 जणांचे कोरोना रिपोर्ट प्रतीक्षेत

मंगळवेढा टाईम्स ऑनलाईन । सोलापूर शहरातील तेलंगी पाच्छा पेठ परिसरात आज (शनिवारी) दुपारी कोरोनाबाधित एक व्यक्ती आढळला आहे. आज दुपारी 165 जणांच्या कोरोना चाचणीचे रिपोर्ट प्रलंबित होते. यात 49 ची वाढ झाली असून आता 214 जणांचे रिपोर्ट प्रलंबित असल्याची माहिती सोलापूरचे जिल्हाधिकारी मिलिंद शंभरकर यांनी आज सायंकाळी दिली. दरम्यान सायंकाळी कोरोना रुग्णांच्या संख्येत कोणतीच वाढ झाली नाही त्यामुळे सोलापूरकरां ना तूर्त दिलासा मिळाला आहे.


सोलापूर जिल्ह्यातील एक हजार 691 जणांना होम क्वारंटाइन करण्यात आले होते. त्यापैकी एक हजार 56 जण सध्या होम क्वारंटाइनमध्ये आहेत. उर्वरित 635 लोकांचा 14 दिवसांचा कालावधी पूर्ण झाला आहे. इन्स्टिट्यूशनल क्वारंटाइनमये एक हजार 31 लोक होते. 315 जणांचा 14 दिवसांचा कालावधी पूर्ण झाला आहे. अद्यापही 716 जण इन्स्टिट्यूशनल क्वारंटाइनमध्ये आहेत.


आयसोलेशन वॉर्डांमध्ये 718 जणांना दाखल करण्यात आले होते. त्यापैकी 504 व्यक्तींचे कोरोना चाचणी रिपोर्ट प्राप्त झाले आहेत. 490 व्यक्तींचे रिपोर्ट निगेटिव्ह आले आहेत. 14 जणांचे रिपोर्ट पॉझिटिव्ह आले आहेत. त्यात पाच्छा पेठ परिसरातील 13 व रविवार पेठ परिसरातील एका व्यक्तीचा समावेश आहे. पाच्छा पेठ परिसरातील एका व्यक्तीचा यापूर्वी मृत्यू झाला असून उर्वरित 13 जणांवर सोलापुरातील छत्रपती शिवाजी महाराज सर्वोपचार रुग्णालयात उपचार सुरू आहेत.

---------------------
ब्रेकिंग बातम्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आम्हाला 9561617373 या नंबरला WhatsApp करा आणि लिहा “Mangalwedha Times News”

No comments:

Post a Comment