CoronaVirus : कोरोना'ची कशी आहे सोलापूर जिल्ह्यातील उपचार व्यवस्था! - Mangalwedha Times

Breaking

Thursday, April 23, 2020

CoronaVirus : कोरोना'ची कशी आहे सोलापूर जिल्ह्यातील उपचार व्यवस्था!


मंगळवेढा टाईम्स वृत्तसेवा । सोलापूर शहर आणि जिल्हयात कोव्हीड :१९ या आजाराच्या रुग्णांसाठी केंद्र शासनाच्या सूचनेनुसार त्रिस्तरीय यंत्रणा उभी करण्यात आली आहे अशी माहिती जिल्हाधिाकारी मिलींद शंभरकर यांनी दिली.


कोव्हीड:१९ अर्थात कोरोनाा विषाणूने बाधित झालेल्या रुग्णांसाठी उपचार करण्यासाठी जिल्हा प्रशासनाने खास यंत्रणा तयार केली आहे. रुग्णांवर उपचार करण्यासाठी जिल्हा प्रशासनाकडे ४७५७ इतके डॉक्टर, ब्रदर, तंत्रज्ञ आणि परिचारिका असे मनुष्यबळ उपलब्ध आहे. यातील ४५६२ जणांना कोरोना रुग्णांवर कसे उपचार करायचे याबाबत खास प्रशिक्षण देण्यात आले आहे. कोरोना आजाराच्या रुग्णांच्या सर्वेक्षणासाठी २८३५ आशा वर्करची मदत घेण्यात येत आहे.


केंद्र शासनाच्या सूचनेनुसार कोरोना रुग्णांच्या उपचारासाठी त्रिस्तरीय उपचार यंत्रणा कार्यान्वित करण्यात आली आहे. यात कोव्हिड केअर, कोव्हिड डेडीकेड हेल्थ आणि कोव्हिड हॉस्पीटल अशा टप्प्यांच्या समावेश आहे. कोव्हिड केअरमध्ये संशयितांवर उपचार केले जात आहेत. कोव्हिड डेडीकेडमध्ये मध्यम स्वरूपाचे सिमटम आढळलेल्या रुग्णांवर उपचार करण्यात येत आहेत तर कोव्हिड हॉस्पीटलमध्ये तीव्र लक्षणे असलेल्या रुग्णांवर उपचार करण्यात येत आहेत.


अशी आहेत उपचाराची ठिकाणे

महापालिका क्षेत्रात ६ ठिकाणी कोव्हीड केअरची व्यवस्था असून, यात २८२५ रुग्णांवर उपचार करण्याची क्षमता आहे. कोव्हिड हेल्थची ६ ठिकाणे असून या ठिकाणी ५४0 रुग्णांची व्यवस्था आहे. कोव्हिड हॉस्पीटलची तीन ठिकाणी व्यवस्था असून, या ठिकाणी ६२0 व्यक्तींवर उपचाराची व्यवस्था आहे. सिव्हिल हॉस्पीटल (शासकीय रुग्णालय), अश्विनी व यशोधरा रुग्णालयाचा यात समावेश आहे.

जिल्ह्यात २५ ठिकाणी व्यवस्था

जिल्ह्यात ११ तालुके व महत्वाची मोठी गावे अशा २५ ठिकाणी कोव्हिड केअरची व्यवस्था असून येथे ४ हजार ८६0 रुग्णांची सोय होणार आहे. त्याचबरोबर तालुक्याच्या ठिकाणी हेल्थ सेंटरची व्यवस्था असून, यात ७२९ जणांवर उपचार करण्याची सोय आहे. तसेच कोव्हिड हॉस्पीटलसाठी ६ ठिकाणी व्यवस्था करण्यात आली असून, ६५८ तीव्र लक्षणे असलेल्या रुग्णांवर उपचार करण्याची सोय करण्यात आली आहे. याशिवाय खाजगी रुग्णालये ताब्यात घेण्याची तयारी असून, गरज भासल्यानंतर ती कार्यवाही करण्यात येणार असल्याचे जिल्हाधिकारी शंभरकर यांनी सांगितले. 

No comments:

Post a Comment