मंगळवेढयात उष्माघाताने एका वृध्दाचा मृत्यू;उन्हाळी हंगामातील जिल्हातील पहिला बळी - Mangalwedha Times

Breaking

Saturday, April 18, 2020

मंगळवेढयात उष्माघाताने एका वृध्दाचा मृत्यू;उन्हाळी हंगामातील जिल्हातील पहिला बळी

मंगळवेढा टाईम्स वृत्तसेवा । मंगळवेढा शहरातील एका 85 वर्षीय वृध्दाचा उष्माघाताने मृत्यू झाला असून याची पोलिसांत नोंद झाली आहे.विठ्ठल तुकाराम सावंजी (रा.खंडोबा गल्ली) असे उष्माघाताने मयत झालेल्या व्यक्तीचे नाव आहे.दरम्यान,यंदाच्या उन्हाळयातील उष्माघाताने मंगळवेढयातील पहिला बळी घेतला आहे.
यातील मयत विठ्ठल सावंजी वय 85 हे दि.17 रोजी दु.1.30 च्या दरम्यान शहरातील भिमनगरजवळ असलेल्या हॉटेल राजकिरणच्या पाठीमागे शेतात घरातून जेवण करून गेले होते. ते वयोवृध्द झाल्याने उष्माघात होवून त्यात मयत झाल्याची खबर मुलगा लक्ष्मण विठ्ठल सावंजी यांनी पोलिसांत दिल्यानंतर पोलिसांनी आकस्मात मयत अशी नोंद केली आहे.दरम्यान पोलिसांनी व्हिसेरा राखून ठेवले आहे. अधिक तपास पोलिस नाईक वाघमोडे हे करीत आहेत. दरम्यान,उष्णतेची तीव्रता दिवसेंदिवस अधिक वाढत आहे.सुर्य आग ओकत असल्याने वयोवृध्द,बालके,रुग्ण उष्णतेने हैराण होत आहेत.


मंगळवेढयात यंदाच्या उन्हाळयात उष्माघाताने पहिला बळी गेल्याने खळबळ उडाली आहे. नागरिकांनी बाहेर पडताना सोबत पाण्याची बॉटल,डोक्यावर रुमाल पांघरून बाहेर पडावे असे आवाहन आरोग्य विभागाकडून करण्यात आले आहे.

---------------------------
ब्रेकिंग बातम्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आम्हाला 9561617373 या नंबरला WhatsApp करा आणि लिहा “Mangalwedha Times News”No comments:

Post a Comment