प्रेमसंबंधामध्ये पत्नीचा अडथळा ; पतीच्या छळाला कंटाळून विवाहितेची आत्महत्या - Mangalwedha Times

Breaking

Thursday, April 30, 2020

प्रेमसंबंधामध्ये पत्नीचा अडथळा ; पतीच्या छळाला कंटाळून विवाहितेची आत्महत्या

मंगळवेढा टाईम्स वृत्तसेवा । प्रेमसंबंधास अडथळा ठरत असल्याने २७ वर्षीय विवाहित महिलेस शारिरिक व मानसिक त्रास देवून आत्महत्येस प्रवृत्त केल्या प्रकरणी पती गणेश मुरलीधर रणदिवे (रा.लक्ष्मी दहिवडी ता.मंगळवेढा) याच्याविरूध्द गुन्हा दाखल झाला आहे.


पोलिस सुत्रांनी दिलेली माहिती अशी, यातील फिर्यादी अर्जून बबन कांबळे (रा.सावळज जि.सांगली) याच्या बहिणीचा पती तथा आरोपी गणेश मुरलीधर रणदिवे याचे नात्यातील महिलेशी प्रेमसंबंध होते.


प्रेमसंबंधास मयत काजल गणेश रणदिवे हिने विरोध केल्याने तिला आरोपीने मारहाण, शिवीगाळ,दमदाटी करून शारिरिक व मानसिक त्रास दिल्याने होणाऱ्या त्रासाला कंटाळून काजल हिने तीच्या राहते घरासमोर असलेल्या शेततळयात दि.२८ रोजी एक वाजता उडी मारून आत्महत्या करण्यास तीला प्रवृत्त केल्याचे दिलेल्या फिर्यादीत म्हटले आहे.


या घटनेचा अधिक तपास पोलिस उपनिरिक्षक सचिन खटके हे करीत आहेत.

--------------------------
ब्रेकिंगनवनवीन ताज्या घडामोडी मोबाईलवर मिळवण्यासाठी आम्हाला 95 6161 7373 या नंबरला WhatsApp करा आणि लिहा “Mangalwedha Times News”

No comments:

Post a Comment