मंगळवेढ्यात दिल्लीहून आलेल्या 'त्या' चौघा जणांना शासकीय क्वारंटाईन मध्ये ठेवले - Mangalwedha Times

Breaking

Friday, April 24, 2020

मंगळवेढ्यात दिल्लीहून आलेल्या 'त्या' चौघा जणांना शासकीय क्वारंटाईन मध्ये ठेवले


मंगळवेढा टाईम्स वृत्तसेवा । मंगळवेढा शहरात दिल्लीहून आलेल्या चार अभियंत्यांची मंगळवेढा ग्रामीण रुग्णालयात तपासणी करून त्यांना शहरालगत असलेल्या मुलींच्या वसतीगृहात विलगीकरण  कक्षात पोलिसांच्या निगराणीखाली ठेवण्यात आले आहे.


दि. 22 रोजी रात्री 7.00 वा. हे  चार अभियंते दिल्लीहून मंगळवेढयात आले होते. हे वृत्त नगरपालिका प्रशासनास समजताच त्यांनी त्या अभियंत्यांना ताब्यात घेवून ग्रामीण रुग्णलयात तपासणीसाठी हजर केले.या चौघा अभियंत्यामध्ये कुठल्याही प्रकारची लक्षणे तपासणीत आढळले नसल्याचे सांगण्यात आले. तदनंतर या चौघांना शहरालगत असलेल्या मुलींच्या वसतीगृहात विलगीकरण कक्षात ठेवण्यात आले आहे.

सदर चार अभियंते हे राष्ट्रीय महामार्गावर काम करत होते. संपूर्ण देशात कोरोनाच्या पार्श्‍वभूमीवर लॉकडाऊनची घोषणा केल्यानंतर ते आपल्या मुळ गावी परतले होते. सध्या जिल्हाधिकारी यांच्या परवानगीने राष्ट्रीय महामार्गाचे काम सुरु झाल्याने सदर ठेकेदाराने त्या चौघा अभियंत्यांना बोलावून घेतल्यामुळे ते मंगळवेढयात हजर झाले होते. चौकशीमध्ये चौघांकडेही अधिकृत प्रवासी पास असल्याचे सांगितले.

------------------------
ब्रेकिंग बातम्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आम्हाला 9561617373 या नंबरला WhatsApp करा आणि लिहा “Mangalwedha Times News”

No comments:

Post a Comment