राज्य व जिल्हाबंदी आदेशाचा भंग करून प्रवास ; सहा परप्रांतीयांविरूध्द गुन्हा - Mangalwedha Times

Breaking

Saturday, April 25, 2020

राज्य व जिल्हाबंदी आदेशाचा भंग करून प्रवास ; सहा परप्रांतीयांविरूध्द गुन्हा


मंगळवेढा टाईम्स ऑनलाईन । राज्य बंदी व जिल्हा बंदीचा आदेश असतानाही तो मोडून मोटर सायकलवर राजस्थानकडे निघालेल्या सहा जणांना पोलिसंानी मोटर सायकल ताब्यात घेवून त्यांच्याविरूध्द आपत्ती व्यवस्थापन कायदयांतर्गत गुन्हा दाखल केला आहे.


दि. 24 रोजी सकाळी मंगळवेढा शहरात पोलिस गस्त घालत असताना बोराळे नाका चौकात ते आले असता समोरून विजापूर रोडने काही मोटर सायकलवरस्वार डबलशीट एका पाठोपाठ सलग येत असल्याचे पोलिसांच्या निदर्शनास आले.
यावेळी त्यांच्या तोंडाला मास्क लावलेला नव्हता. 


त्यांना हात दाखवून थांबवून कोठून आलात? व कोठे चाललात ? असे विचारले असता तामिळनाडूकडून आलो असून राजस्थानमध्ये जात असल्याचे हिंदी भाषेत सांगितले.आम्ही सर्वजण काम बंद असल्याने आमचे घराकडे मोटर सायकलवर निघालो आहोत असे त्या सहा जणांनी पोलिसांना सांगितले.


त्यांच्याकडे कोणताही परवाना नसल्याचे चौकशीत उघड झाले. जिल्हा बंदचा व राज्य बंदचे उल्लंघन करून प्रवास करीत असल्याने ओमप्रकाश तुलसाराम (वय 24),भगिरथ सावंताराम(वय 34),राजूराम हरीराम(वय 36),दिनेशकुमार तुलसाराम(वय 22),अशोक अवराम(वय 18),हणमान जगराम (वय 19) सर्व राहणार राजस्थान या सहा जणांना पोलिसांनी ताब्यात घेवून कोणतीही परवानगी नसताना बेकायदेशीरपणे प्रवास करून शासनाच्या आदेशाचा भंग केल्याने त्यांच्याविरूध्द पोलिस उपनिरिक्षक सचिन खटके यांच्या फिर्यादीवरून गुन्हा दाखल  करण्यात आला.वरील सहा जणांना तहसीलदार यांच्या आदेशाने बालाजी नगर येथील आश्रमशाळेत ठेवण्यात आले आहे.

--------------------
ब्रेकिंग बातम्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आम्हाला 9561617373 या नंबरला WhatsApp करा आणि लिहा “Mangalwedha Times News”

No comments:

Post a Comment