संतापजनक : सोलापुरात समुपदेशन करणाऱ्या नर्सची व तिच्या पतीची गाडी जाळली - Mangalwedha Times

Breaking

Friday, April 17, 2020

संतापजनक : सोलापुरात समुपदेशन करणाऱ्या नर्सची व तिच्या पतीची गाडी जाळलीमंगळवेढा टाईम्स ऑनलाईन । एकत्र खेळू नका कोरोनाचा संसर्ग वाढेल, अशी सूचना करणाऱ्या परिचारिकेची व तिच्या पतीची दुचाकी जाळण्याचा प्रकार कुंभारी (ता. दक्षिण सोलापूर) येथील गोदूताई परुळेकर विडी कामगार वसाहत येथे घडला आहे.याबाबत माहिती अशी, मार्कंडेय सहकारी रुग्णालयातील परिचारिका सुरेखा श्रीशैल पुजारी (वय 30) या गुरुवारी पती श्रीशैल पुजारी (वय 32, रा.817/4, गोदूताई विडी कामगार वसाहत) यांच्याबरोबर रुग्णालयाला कर्तव्यावर जात होत्या. गोदूताई घरकुलच्या मोकळ्या मैदानावर काही तरुण सोशल डिस्टन्स न ठेवता खेळत होते. त्यांना पुजारी दाम्पत्याने, कोरोनाचा संसर्ग वाढत आहे, रुग्णांची संख्या 12 झाली असून, त्यातील एकाच मृत्यू झाला आहे, आता तरी तुम्ही असे मैदानात एकत्र खेळू नका, अशी सूचना केली.


त्यावर काही तरुणांनी, तू दररोज मार्कंडेय हॉस्पिटलला जातेस तुझ्यामुळे कोरोना येत नाही का, असं म्हणत, तुला बघून घेतो, अशी दमदाटी केली. यामुळे पुजारी दाम्पत्याने कुंभारी पोलिस चौकीमध्ये तक्रार केली, मात्र कोणीही पोलीस आले नाहीत.


दरम्यान, शुक्रवारी (ता. 17) पहाटे 2 वाजता अज्ञात समाजकंटकांनी शुक्रवारी पहाटे 2 वाजता
सुरेखा पुजारी यांची दुचाकी (एमएच 13- 6155) आणि त्यांच्या पतीची दुचाकी (एमएच 13 सी 4213) या दोन्ही गाड्या पेट्रोल टाकून जाळल्या.

याबाबत गोदूताई परुळेकर पोलीस चोकीला माहिती दिली असता, पोलिसांनी घटनेची छायाचित्रे घेऊन, पुजारी यांना वळसंग पोलीस ठाण्यात फिर्याद देण्यास सांगितले.


याबाबत फिर्याद देण्यास पुजारी दाम्पत्य वळसंग पोलीस ठाण्यात गेले असता, अधिकारी शुक्रवारी सकाळी हजर नसल्याने सकाळी गुन्हा दाखल होण्यास सुरवातही झाली नाही.
-----------
ब्रेकिंग बातम्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आम्हाला 9561617373 या नंबरला WhatsApp करा आणि लिहा “Mangalwedha Times News”हेही वाचा : SolapurUpdate : 'त्या' पॉझिटिव्ह रुग्णांच्या संपर्कातील 50 जणांना घेतले ताब्यात 

-परप्रांतिय कामगारांनी केली पोलिसांवर दगडफेक; चार पोलीस जखमी 

No comments:

Post a Comment