मुंबई, पुण्यात सरकारी कार्यालयातील उपस्थिती पुन्हा ५ टक्के - Mangalwedha Times

Breaking

Thursday, April 23, 2020

मुंबई, पुण्यात सरकारी कार्यालयातील उपस्थिती पुन्हा ५ टक्के


मंगळवेढा टाईम्स वृत्तसेवा । राज्यात कोरोना रुग्णांच्या संख्येत वाढ होता आहे. मुंबई आणि पुणे येथे रुग्ण संख्येत वाढ होत आहे. त्यामुळे  कोरोनाच्या वाढत्या प्रादुर्भावामुळे मुंबई, पुण्यात शासकीय कार्यालयातील उपस्थिती पुन्हा ५ टक्क्यांवर करण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला आहे.  धुळ्यात ७, मालेगावांत ५, जालन्यात १ रुग्ण नव्याने आढळले तर नंदुरबारमध्ये  कोरोनाचा पहिला बळी गेला आहे. तर जळगावतही एका कोरोनाबाधित व्यक्तीचा मृत्यू झाला आहे.

मुंबई परिसर आणि पुणे परिसरातील कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव लक्षात घेता या भागातील शासकीय कार्यालयातील उपस्थिती पुन्हा पाच टक्क्यांवर आणण्याचा निर्णय राज्य सरकारनं घेतला आहे. लॉकडाऊन शिथिल केल्यानंतर २० एप्रिलपासून शासकीय कार्यालयातील उपस्थिती १० टक्के करण्यात आली होती. मात्र मुंबई एमएमआर विभाग आणि पुणे पीएमआर विभागातील कोरोनाचे रुग्ण मोठ्या प्रमाणात वाढत असल्याने या भागातील शासकीय कार्यालयातील उपस्थिती पुन्हा पाच टक्क्यांवर आणण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला आहे. 

No comments:

Post a Comment