CoronaVirus :कोरोनाचा कहर 'या' ठिकाणी एक वर्ष शाळा-कॉलेज बंद राहण्याची शक्यता? - Mangalwedha Times

Breaking

Thursday, April 23, 2020

CoronaVirus :कोरोनाचा कहर 'या' ठिकाणी एक वर्ष शाळा-कॉलेज बंद राहण्याची शक्यता?


मंगळवेढा टाईम्स वृत्तसेवा । अमेरिकेत कोरोना विषाणूचा वाढता संसर्ग लक्षात घेता सरकारने संपूर्ण सत्र शाळा आणि महाविद्यालये बंद करण्याचे आदेश दिले आहेत. हा निर्णय वॉशिंग्टन डीसीसह देशातील किमान 37 राज्यात लागू करण्यात आला आहे. संसर्गावर मात करण्यासाठी अमेरिकेने हा निर्णय घेतला आहे. आता प्रश्न असा आहे की भारतातही अशी परिस्थिती निर्माण होऊ शकते काय?


सीएनएनच्या अहवालानुसार, अमेरिकेतील बहुतेक राज्यपालांनी आदेश दिले आहेत की राज्यात शाळा बंद ठेवल्यास कोरोना विषाणूचा प्रसार रोखण्यास मदत होईल. हे आदेश 37 राज्यात लागू करण्याची शिफारस करण्यात आली आहे.


अमेरिकेची बरीच राज्ये सामाजिक अंतरांच्या नियमांचे पालन करून शाळा उघडू शकतात असे म्हणत आहेत. परंतु ज्या प्रकारची परिस्थिती आहे त्यानुसार विद्यार्थ्यांचे शाळेत जाणं धोक्याचे ठरु शकते.अमेरिकेच्या सरकारने विविध टप्प्यात देशातील काही क्षेत्र उघडण्यासाठी नवीन मार्गदर्शक सूचना देखील जारी केल्या आहेत परंतु शाळा सुरू होण्यावर निर्बंध कायम आहेत.


फ्लोरिडा, टेक्सास आणि वॉशिंग्टन तसेच वॉशिंग्टन डीसी यासह अनेक राज्यांनी विद्यार्थ्यांनी घरीच अभ्यास करावा असे आदेश जारी केले आहेत.


या निर्णयाची अंमलबजावणी 37 राज्यांत होऊ शकते, याचा परिणाम अमेरिकेतील करोडो शालेय विद्यार्थ्यांवर होईल. याव्यतिरिक्त अ‍ॅरिझोना, हॉवर्ड आणि बोस्टन विद्यापीठही बंद राहील. अनेक विद्यार्थ्यांनी सरकारच्या या निर्णयाचे स्वागत केले आहे. बोस्टन युनिव्हर्सिटीने स्पष्टपणे म्हटले आहे की, २०२० मध्ये विद्यार्थ्यांना बोलवणे त्यांच्या आरोग्यासाठी धोकादायक ठरू शकते.


कॅलिफोर्निया, इडाहो, साउथ डकोटा आणि टेनेसी यांनी सांगितले आहे की विद्यार्थ्यांना डिस्टन्स लर्निंग मॉडेलद्वारे शिकवले जाईल. त्यासाठी ऑनलाईन माध्यमांचा वापर केला जाईल. सध्या अभ्यास ऑनलाईन माध्यमातून घेण्यात येत आहे.

No comments:

Post a Comment