धक्कादायक : सोलापुरात एका नर्सची कोरोनाची टेस्ट पॉझिटिव्ह - Mangalwedha Times

Breaking

Tuesday, April 14, 2020

धक्कादायक : सोलापुरात एका नर्सची कोरोनाची टेस्ट पॉझिटिव्हमंगळवेढा टाईम्स वृत्तसेवा । सोलापुरात कोरोनामुळे एका दुकानदाराचा मृत्यू झाला होता. यानंतर या दुकानदाराच्या संपर्कात आलेल्या 91 जणांचे स्वँब तपासण्यात आले. यातील 67 जणांचे हाती आले आहेत. यामध्ये खाजगी रुग्णालयातील एका नर्सला कोरोनाची लागण झाल्याचे उघडकीस आले आहे. अद्याप चोवीस जणांचे अहवाल हाती येणे बाकी आहे.
सोलापुरात पाच्छा पेठ मध्ये कोरोना रुग्ण आढळून आल्यानंतर त्याच्याशी संबंधित 94 जणांची कोरोना चाचणी घेण्यात आली होती . यापैकी आज दुपारी बारा वाजेपर्यंत 67 जणांचे अहवाल प्राप्त झाले आहेत.


यापैकी 66 जणांची कोरोना चाचणी निगेटिव्ह आली आहे.तर एका महिलेचा अहवाल कोरोना पॉझिटिव्ह आला आहे . ही माहिती जिल्हाधिकारी मिलिंद शंभरकर यांनी प्रसिद्ध माध्यमांना बोलताना दिली.


उर्वरित चाचणी अहवाल सायंकाळपर्यंत येतील असेही जिल्हाधिकारी म्हणाले . लोकांनी कोणत्याही अफवांवर विश्वास ठेवू नये . प्रशासनाला सहकार्य करावं . तपासणी करण्यास येणाऱ्या कर्मचाऱ्यांना माहिती द्यावी असेही आवाहन जिल्हाधिकाऱ्यांनी केलं आहे .

No comments:

Post a Comment