CoronaVirus : नागरिकांनी अफवांवर विश्वास ठेवू नये : तहसीलदार रावडे - Mangalwedha Times

Breaking

Thursday, April 16, 2020

CoronaVirus : नागरिकांनी अफवांवर विश्वास ठेवू नये : तहसीलदार रावडे


मंगळवेढा टाईम्स वृत्तसेवा । ‘कोरोना’वरून काही अज्ञातांकडून अफवा पसरविल्या जात असल्याने नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण पसरत आहे. नागरिकांनी यावर विश्वास ठेवू नये,’ असे आवाहन तहसीलदार स्वप्नील रावडे यांनी केले.


कोरोनाशी संबंधित लक्षणांची माहिती देऊन शंका वाटल्यास आरोग्य केंद्राशी संपर्क साधण्याचे आवाहनही तहसीलदार रावडे यांनी केले. डॉक्‍टरांनी ‘कोरोना’शी लढण्यासाठी एकत्र काम करण्याचे आश्वासन दिले. 


सोलापूर जिल्ह्यासह मंगळवेढा परिसरातील काही व्यक्तींना ‘कोरोना’च्या रुग्णाच्या संपर्कातील आले असल्याने त्या व्यक्तींना सोलापूर जिल्हा रुग्णालयात उचलून नेले आहे अशी खोटी माहिती पसरविण्यात आल्याने नागरिकांमध्ये घबराट पसरली. अशा अफवांवरुन तहसीलदार स्वप्नील रावडे यांनी गंभीर इशारा दिला.


अशा प्रकारे चुकीचे संदेश पसरवू नयेत. तसेच समाजभान ठेवण्याचेही आवाहन त्यांनी या वेळी केले.
-------------
ब्रेकिंग बातम्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आम्हाला 9561617373 या नंबरला WhatsApp करा आणि लिहा “Mangalwedha Times News”

No comments:

Post a Comment