चिंताजनक : घेरडीतील 'तो' कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण 20 जणांच्या संपर्कात - Mangalwedha Times

Breaking

Sunday, April 26, 2020

चिंताजनक : घेरडीतील 'तो' कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण 20 जणांच्या संपर्कात


मंगळवेढा टाईम्स वृत्तसेवा । कोराना पॉझिटिव्ह रुग्ण घेरडी ( ता. सांगोला) येथे आढळून आला आहे. २० व्यक्ती त्यांच्या संपर्कात होत्या. त्यांचा अहवाल उद्यापर्यंत समजणार आहे़ पॉझिटिव्ह सापडलेला व्यक्ती हा मुंबईहुन टँकरने प्रवास केला असल्याचे पालकमंत्री दत्तात्रय भरणे यांनी सांगितले.

कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण सांगोला तालुक्यातील घेरडी गावात सापडल्यामुळे दत्तात्रेय भरणे यांनी गावची पाहणी केली आहे. यानंतर त्यांनी सांगोला तालुक्यातील सर्व अधिकाºयांची बैठक घेतली. पंढरपूर येथे आल्यानंतर त्यांनी शासकीय विश्रामगृहात पत्रकारांशी संवाद साधला.

पुढे ते म्हणाले, सांगोला तालुक्यातील २० टक्के लोक मुंबई येथे काम धंद्यानिमित्त स्थायिक झाले आहेत. कोरोना साथीच्या रोगामुळे ते पुन्हा गावी परतत आहेत. त्याच प्रकारे टँकरद्वारे प्रवास करून कोरोना पॉझिटिव्ह घेरडी (ता. सांगोला) येथे आला होता. त्याला होमकॉरंटाईन करण्यात आले होते. 


परंतु तो मोकाटच फिरत होता. २० व्यक्ती त्यांच्या संपर्कात होत्या. त्यांना सोलापूरला तपासणीसाठी पाठवलेला आहे. त्या सर्वांचा अहवाल उद्या पर्यंत समजणार असल्याचे भरणे यांनी सांगितले.

-------------------
ब्रेकिंग बातम्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आम्हाला 9561617373 या नंबरला WhatsApp करा आणि लिहा “Mangalwedha Times News”

No comments:

Post a Comment