Breaking : सोलापुरात करोनाने पार केली शंभरी ; तब्बल 21 रुग्ण एकाच दिवसात - Mangalwedha Times

Breaking

Thursday, April 30, 2020

Breaking : सोलापुरात करोनाने पार केली शंभरी ; तब्बल 21 रुग्ण एकाच दिवसात


मंगळवेढा टाईम्स ऑनलाईन । सोलापुरात 102 पेशंट पॉझिटिव्ह असल्याची माहिती पालकमंत्री दत्तात्रय भरणे यांनी दिली आहे.आजपर्यंत सहा बाधित रुग्णांचा मृत्यू झाला आहे हेही त्यांनी सांगितले.आजच्या आढावा बैठकीनंतर प्रसार माध्यमांशी ते बोलत होते.


तीन पेशंटना आज निगेटिव्ह रिपोर्ट आल्याने डिस्चार्ज दिला असल्याचंही त्यांनी सांगितलं . काल सोलापूर मध्ये 81 बाधित रुग्ण असल्याची माहिती जिल्हाधिकारी मिलिंद भिरकर यांनी दिली होती.


मात्र आज एकाच दिवसात 21 रुग्णांची भर पडली आहे . हे पालकमंत्र्यांच्या बोलण्यावरून दिसून येत आहे . आज गुरुवारी संध्याकाळी जिल्हाधिकाटी सविस्तर वैद्यकीय अहवाल आणि सोलापूरची सद्यस्थिती आकडेवारीसह सांगतील तेव्हा नेमके कोणत्या परिसरात किती रूग्ण झाले आहेत याची माहिती मिळेल.
---------------------
ब्रेकिंगनवनवीन ताज्या घडामोडी मोबाईलवर मिळवण्यासाठी आम्हाला 9561617373 या नंबरला WhatsApp करा आणि लिहा “Mangalwedha Times News”

No comments:

Post a Comment