टेंशन वाढले : सोलापुरातील 10 जणांची कोरोना टेस्ट पॉझिटिव्ह - Mangalwedha Times

Breaking

Thursday, April 16, 2020

टेंशन वाढले : सोलापुरातील 10 जणांची कोरोना टेस्ट पॉझिटिव्ह



मंगळवेढा टाईम्स वृत्तसेवा । सोलापूर शहरात आणखीन दहा कोरोनाचे पॉझिटिव्ह रुग्ण मिळून आले असल्याची माहिती जिल्हाधिकारी मिलिंद शंभरकर यांनी दिली आहे .


जे दोन रुग्ण सोलापुरात पाच्छा पेठ परिसरात काही दिवसांपूर्वी सापडले .यातील एका मृत  पॉझिटिव्ह व्यक्तीचे नातेवाईक पैकी एक आहे .

 तर इतर पॉझिटिव्ह महिलेच्या संपर्कातील नऊ रुग्ण पॉझिटिव्ह आढळून आले आहेत.
हे सर्वजण पाच्छा पेठ परिसरातीलच आहेत यामुळे सोलापुरात एकूण पॉझिटिव्ह रुग्णांची संख्या आज दुपारी बारा वाजेपर्यंत बारा इतकी झाली असून, यातील एक व्यक्ती यापूर्वीच मृत्यू पावला आहे.


तर बाकी सर्व 11 रुग्णांवर उपचार सुरू आहेत. लोकांनी सरकारी यंत्रणेच्या आवाहनास प्रतिसाद द्यावा .सोशल डिस्टन्स पाळावा असे आवाहनही जिल्हाधिकारी यांनी केलं आहे.
------------
ब्रेकिंग बातम्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आम्हाला 95 6161 7373 या नंबरला WhatsApp करा आणि लिहा “Mangalwedha Times News”

No comments:

Post a Comment