Lockdown : 'या' तारखेपासून केशरी शिधापत्रिकाधारकांना धान्य मिळणार! - Mangalwedha Times

Breaking

Wednesday, April 22, 2020

Lockdown : 'या' तारखेपासून केशरी शिधापत्रिकाधारकांना धान्य मिळणार!


मंगळवेढा टाईम्स वृत्तसेवा । केशरी शिधापत्रिकाधारकांना आता एक मे ऐवजी 25 एप्रिलपासून रेशन दुकानातून गहू आणि तांदूळ सवलतीच्या दरात उपलब्ध करून देण्यात येणार आहे. मे आणि जून या दोन महिन्यांसाठी धान्य उपलब्ध करून देण्यात येणार आहे.


विभागीय आयुक्त डॉ. दीपक म्हैसेकर यांनी याबाबत आदेश जारी केले. केशरी कार्डधारकांना गहू प्रतिव्यक्ती तीन किलो तर, तांदूळ प्रति व्यक्ती दोन किलो मिळणार आहे. केशरी कार्डधारकांसाठी गहू आठ रुपये प्रति किलो दराने आणि तांदूळ प्रति किलो 12 रुपये दराने मिळणार आहे.  25 एप्रिलपासून मे महिन्याचे धान्य मिळणार आहे.

शहरात केशरी शिधापत्रिकाधारकांची संख्या सुमारे 5 लाख तर, शहर वगळता जिल्ह्यात सुमारे तीन लाख दहा हजार केशरी शिधापत्रिकाधारक आहेत. अशा एकूण सुमारे आठ लाख कुटुंबातील लाभार्थ्यांना गहू आणि तांदूळ वितरित करण्यात येणार आहे.केशरी कार्डधारकांना धान्य वितरित करताना दुकानासमोर गर्दी वाढण्याची शक्यता आहे. त्यामुळे पोलिस बंदोबस्त द्यावा, अशी मागणी अखिल महाराष्ट्र राज्य स्वस्त धान्य दुकानदार महासंघाने केली आहे.

No comments:

Post a Comment