मुंबईत पुन्हा मोठी वाढ, 24 तासांत 419 नवे कोरोनाचे रुग्ण; राज्याचा आकडा 5000 पार - Mangalwedha Times

Breaking

Wednesday, April 22, 2020

मुंबईत पुन्हा मोठी वाढ, 24 तासांत 419 नवे कोरोनाचे रुग्ण; राज्याचा आकडा 5000 पार


मंगळवेढा टाईम्स वृत्तसेवा । देशभरात कोरोनाबाधितांचा (Coronavirus) आकडा दिवसेंदिवस वाढत आहे. अशातच आज पुन्हा कोरोना (Covid -19) रुग्णांच्या संख्येत मोठी वाढ झाली आहे. गेल्या 24 तासांत मुंबईत (Mumbai) 419 कोरोना बाधित रुग्णांची नोंद करण्यात आली असून ही मोठी वाढ आहे. तर राज्यात आज 552 नवीन रुग्ण दाखल करण्यात आले असून एकूण कोरोनाबाधितांचा आकडा 5000 पार गेला आहे.

आतापर्यंत राज्यातील रुग्णांची संख्या 5218 पर्यंत पोहोचली असून राज्याने आज 5 हजार रुग्णांचा टप्पा ओलांडला आहे.

सध्या मुंबईत इतर शहरांच्या तुलनेत सर्वाधिक 3451 रुग्ण कोरोनाबाधित आहेत. मुंबईत आज 24 तासात 419 रूग्ण संख्या वाढली आहे. काल मुंबईत 3032  रूग्ण होते, आज ही संख्या 3451 पर्यंत पोहोचली आहे. मुंबईतील सर्वाधित धोका असलेल्या धारावीत आज 12 नव्या रुग्णांची नोंद झाली असून आता येथील एकूण रुग्णसंख्या 180 पर्यंत पोहोचली आहे. मुंबई महापालिका क्षेत्रात बाधित रुग्णांची संख्या 3451 वर असून आतापर्यंत 151 जणांचा मृत्यू झाला आहे. आज ५० रूग्णांना डिस्चार्ज देण्यात आलं आहे.


आज राज्यात 552 नवीन रुग्णांची नोंद करण्यात आली असून 19 रुग्णांचा मृत्यू झाला आहे. आज 150 जणांना डिस्चार्ज देण्यात आला आहे आतापर्यंत राज्यातील 722 कोरोना बाधित रुग्णांना डिस्चार्ज दिला आहे. एकीकडे कोरोनाबाधितांची संख्या मुंबईत वाढत असली तरी दुसरीकडे आज कस्तुरबातून 100 व्या रुग्णाला डिस्चार्ज मिळाला आहे. त्यामुळे कोरोनाबाधित रुग्ण बरे होण्याच्या संख्येतही वाढ झाली आहे.

No comments:

Post a Comment