चिंताजनक : सोलापुरात आज आणखी एक पॉझिटिव्ह रुग्ण आढळला;सोलापूरकरांची चिंता वाढली - Mangalwedha Times

Breaking

Saturday, April 18, 2020

चिंताजनक : सोलापुरात आज आणखी एक पॉझिटिव्ह रुग्ण आढळला;सोलापूरकरांची चिंता वाढली


मंगळवेढा टाईम्स वृत्तसेवा । सोलापूर शहरातील तेलंगी पाच्छा पेठ परिसरात आज (शनिवारी) आणखी एक कोरोना बाधित रुग्ण आढळला आहे. सोलापूरचे जिल्हाधिकारी मिलिंद शंभरकर यांनी याबाबतची माहिती आज दुपारी दिली आहे.


सोलापुरातील कोरोनाबाधित रुग्णांची संख्या आता 14 झाली आहे. तेलंगी पाच्छा पेठेतील 56 वर्षीय किराणा दुकानदाराचा यापूर्वीच मृत्यू झाला आहे. उर्वरित व्यक्तींवर सोलापुरातील छत्रपती शिवाजी महाराज सर्वोपचार रुग्णालयात उपचार सुरू असल्याची माहितीही जिल्हाधिकारी शंभरकर यांनी दिली आहे.


सोलापूर जिल्ह्यातील 669 व्यक्तींचे नमुने कोरोना चाचणीसाठी घेण्यात आले होते. आज दुपारपर्यंत त्यापैकी 504 जणांचे अहवाल प्राप्त झाले आहेत. त्यापैकी 490 जणांचे रिपोर्ट निगेटिव्ह आले असून 14 जणांचे रिपोर्ट पॉझिटिव्ह आले आहेत. अद्यापही 165 जणांचे कोरोना चाचणी रिर्पोट प्रतीक्षेत असल्याची माहिती जिल्हाधिकारी शंभरकर यांनी दिली.


याबाबत जिल्हाधिकार्‍यांनी सोलापूर शहर व जिल्ह्यातील नागरिकांना घरातच राहण्याचे आवाहन केले असून सर्वांनी मास्कचा वापर करावा व कामाशिवाय घराबाहेर पडू नये असे आवाहन केले आहे.
-------------------------
ब्रेकिंग बातम्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आम्हाला 9561617373 या नंबरला WhatsApp करा आणि लिहा “Mangalwedha Times News”

No comments:

Post a Comment