#Solapur : तीन भावांनी मिळून केलेल्या मारहाणीत महिलेचा मृत्यू,पती अन् मुलगीही जखमी - Mangalwedha Times

Breaking

Tuesday, April 21, 2020

#Solapur : तीन भावांनी मिळून केलेल्या मारहाणीत महिलेचा मृत्यू,पती अन् मुलगीही जखमी

मंगळवेढा टाईम्स ऑनलाईन । माझ्या बायकोला नांदवायला का पाठवत नाही म्हणून तीन भावांनी एका महिलेचा खून केला असल्याची घटना मोहोळ तालुक्यातील भीमा नदी काठवरील अरबळी या गावात सोमवार दि .२० एप्रिल रोजी रात्री नऊ वाजण्यापूर्वी घडली आहे. यामध्ये मयत महिलेची दीड वर्षाची मुलगी जखमी झाली आहे. अरबळी येथील शीतल अर्जुन काळे (वय २२) असे या मयत महिलेचे नाव आहे.


मयत शीतलची ननंद माया अर्जुन भोसले हिचे (जामगाव ता .मोहोळ) येथील महिंद्र सुभान भोसले याच्याशी लग्न झाले होते, परंतु दीड वर्षांपासून माया ही माहेरी रहात होती. तिचा नवरा महिंद्र भोसले हा तिला नांदायला घरी चल असे म्हणून तगादा लावला होता, परंतु माया ही नांदायला जायला तयार नव्हती. 


यातूनच वाद होऊन तुम्हीच तिला पाठवत नाही असे म्हणून महिंद्र सुभान भोसले, महेर सुभान भोसले, बाळासाहेब सुभान भोसले (सर्वजण रा जामगाव, ता. मोहोळ) या तिघांनी शीतल अर्जुन काळे हिचा खून केला. यामध्ये मयताची दीड वर्षांची जोधाबाई अर्जुन काळे ही जखमी झाली आहे.

याबाबत मयताच्या पतीने अर्जुन समाधान काळे याने कामती पोलीस ठाण्यात फिर्याद दाखल केली आहे. अधिक तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक किरण उंदरे हे करीत आहेत.

------------------------
ब्रेकिंग बातम्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आम्हाला 9561617373 या नंबरला WhatsApp करा आणि लिहा “Mangalwedha Times News”

No comments:

Post a Comment