CoronaVirus : मास्क न लावल्यास आता द्यावा लागणार 500 रुपयांचा दंड ! - Mangalwedha Times

Breaking

Tuesday, April 14, 2020

CoronaVirus : मास्क न लावल्यास आता द्यावा लागणार 500 रुपयांचा दंड !मंगळवेढा टाईम्स वृत्तसेवा । मंगळवेढा शहरातील सर्व नागरिकांना नगरपरिषदेमार्फत कळविण्यांत येते की, नागरिकांनी अत्यावश्यक कामाशिवाय घराबाहेर पडू नये.तसेच अत्यावश्यक कामासाठी सार्वजनिक ठिकाणी फिरताना मास्कचा वापर कटाक्षाने करावा.मास्क न वापरता सार्वजनिक ठिकाणी फिरताना कोणतीही व्यक्ती निदर्शनास आल्यास रु.500 दंड केला जाईल याची गांभीर्याने नोंद घ्यावी अशी माहिती मुख्याधिकारी पल्लवी पाटील यांनी दिली आहे.


मंगळवेढा शहरात 2 पेक्षा अधिक लोकांनी एकत्र येऊ नये, सार्वजनिक ठिकाणी थुंकू नये तसे केल्यास रु.500 दंड आकारण्यात येईल.तसेच परदेशातुन ,परराज्यातुन ,परजिल्ह्यातून आलेल्या लोकांनी स्वत:ला Home Quarantine करुन घ्यावे.


सदरचे व्यक्ती बाहेर आढळून आल्यास संबंधितांवर आपत्ती अधिनियम 2005 व महाराष्ट्र कोविड उपाययोजना नियम 2020 व साथ रोग अधिनियम 1897 अन्वये कारवाई करणेत येईल याची गांभीर्याने नोंद घ्यावी. तसेच मंगळवेढा शहरातील सर्व नागरीकांना कळविण्यांत येते की, सध्या कोरोना (कोव्हीड-19) विषाणूचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी प्रतिबंधात्मक उपाययोजना बाबतची कार्यवाही सुरु आहे.


मंगळवेढा नगरपरिषदेमध्ये गर्दी होवू नये यासाठी शहरातील काही अडचणी/तक्रारी असल्यास नगरपरिषदेच्या टोल फ्री नंबर 18002332275 या क्रमांकावर संपर्क साधावा. तसेच आपल्या आसपास परदेशातील, परराज्यातील, परजिल्यातील नागरिक आल्यास अथवा ILI व SARI  चा सर्व्हे करावयाचा राहुन गेल्यास सदर टोल फ्री क्रमांकावर संपर्क साधावा  असे मुख्याधिकारी पल्लवी पाटील मँडम यांनी आवाहन केले.  

--------------
ब्रेकिंग बातम्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आम्हाला 95 6161 7373 या नंबरला WhatsApp करा आणि लिहा “Mangalwedha Times News”

No comments:

Post a Comment