CoronaVirus : भारताच्या चिंतेत वाढ, ८० टक्के रूग्णांमध्ये करोनाची लक्षणंच नाहीत! - Mangalwedha Times

Breaking

Tuesday, April 21, 2020

CoronaVirus : भारताच्या चिंतेत वाढ, ८० टक्के रूग्णांमध्ये करोनाची लक्षणंच नाहीत!मंगळवेढा टाईम्स वृत्तसेवा । करोना व्हायरसचा देशातील प्रभाव दिवसागणिक वाढतच असून गेल्या २४ तासांत १५०० पेक्षा जास्त रूग्ण आढळले आहेत. तर ४० जणांचा करोना व्हायरसमुळे मृत्यू झाल्याची माहिती आरोग्य विभागानं दिली आहे. करोना व्हायरसमुळे संक्रमीत झालेल्या रूग्णांची संख्या दररोज वाढतच आहे. 


देशातील एकूण रूग्णांची संख्या १७ हजारांच्या पुढे गेली आहे. दररोज रूग्णांच्या संखेत वाढ होत असतानाच एक चिंताजनक माहिती समोर आली आहे. इंडियन कौन्सिल ऑफ मेडिकल रिसर्च संस्थेने (आयसीएमआर) दिलेल्या माहितीनुसार, जवळपास ८० टक्के रूग्णांमध्ये करोनाची कोणतीही लक्षणं दिसून आलेली नाहीत.


आयसीएमआरच्या साथी आणि संसर्गजन्य रोग विभागाचे राष्ट्रीय प्रमुख पद्मश्री डॉ. रमण गंगाखेडकर यांनी पत्रकार परिषदेत ही माहिती दिली. 


ते म्हणाले की, करोना सामना करण्यासाठी सर्वोतोपरी प्रयत्न सुरू आहेत. पण सकारात्मक अहवाल आढळलेल्या जवळपास ८० टक्के रूग्णांमध्ये करोनाची कोणतीही लक्षणं दिसून आली नाहीत. ही बाब चिंताजनक आहे. त्यामुळे करोना बाधितांचा शोध घेऊन उपचार करणे कठीण जात आहे. पण आशावेळी करोनाचा तपास लावण्याचा एकच पर्याय आहे तो म्हणते करोनाबाधित रूग्ण आढळल्यानंतर त्याच्या संपर्कात आलेले आणि परिसरातील सर्वांची करोना चाचणी करणे. त्याशिवाय करोनाबाधितांचा शोध घेणं कठीण जाणार आहे. जर अशा पद्धतीनं तपासणी नाही केली तर भारताची परिस्थिती अवघड होईल, असेही गंगाखेडकर म्हणाले.


सर्दी, ताप आणि खोकला असणाऱ्यांना करोना संशयित म्हणून आयसोलेट किंवा क्वारंटाइन करण्यात येत आहे. पण दिल्लीमध्ये मागील २४ तासांत आढळलेल्या करोनाबाधित रूग्णांना सर्दी, खोकला आणि ताप या सारखी कोणतीही लक्षणं दिसलेली नाहीत. त्यामुळे अशा रूग्णांची संख्या मोठ्या प्रमाणात असण्याची शक्यता आहे. दिल्लीत आढळून आलेल्या जवळपास २५ टक्के रुग्णांमध्ये कोणतीही लक्षण दिसली नाही आणि हे चिंताजनक आहे, असेही त्यांनी सांगितले.

------------------------
ब्रेकिंग बातम्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आम्हाला 9561617373 या नंबरला WhatsApp करा आणि लिहा “Mangalwedha Times News”

No comments:

Post a Comment