SolapurUpdate : 'त्या' पॉझिटिव्ह रुग्णांच्या संपर्कातील 50 जणांना घेतले ताब्यात - Mangalwedha Times

Breaking

Thursday, April 16, 2020

SolapurUpdate : 'त्या' पॉझिटिव्ह रुग्णांच्या संपर्कातील 50 जणांना घेतले ताब्यात


मंगळवेढा टाईम्स वृत्तसेवा । सोलापूर शहरातील बाधित महिलेच्या संपर्कातील आलेल्या 22 व्यक्ती होत्या.त्यांची टेस्ट घेण्यात आली.त्यापैकी बारा व्यक्तींचे अहवाल निगेटिव्ह आलेले आहेत.9 अहवाल पॉझिटिव्ह आले आहेत तर एक रिपोर्ट येणे बाकी आहे.आज सकाळी ज्या 10 व्यक्तींचे अहवाल पॉझिटिव्ह आले होते . त्यांच्या संपर्कातील असलेल्या 50 व्यक्तींना तपासणीसाठी प्रशासनाने ताब्यात घेतले आहे.


या 50 व्यक्तीना इन्स्टिट्यूशनल क्वॉरंटाइन मध्ये ठेवण्यात आले आहे. त्यांचे स्वॅब घेण्यात आले आहेत. अशी माहिती जिल्हाधिकाटी मिलिंद शंभरकर यांनी दिली आहे.


होम क्वॉटंटाइन झालेल्या एकूण व्यक्ती : 1466,होम क्वॉरंटाइन पूर्ण केलेल्या व्यक्ती : 475 ( 14 दिवस कालावधी पूर्ण ) , अद्याप होम क्वॉरंटाइनमध्ये असलेल्या : 991 ( हाताला शिक्के लावलेले ) , इन्स्टिट्यूशनल क्वॉरंटाइन मध्ये 925 व्यक्ती होत्या.


त्यापैकी 243 जणांचा कालावधी पूर्ण झालेला आहे . तर 682व्यक्ती अद्यापही इन्स्टिट्यूशनल क्वॉटंटाइन मध्ये असल्याची माहिती जिल्हाधिकायांनी दिली.


आयसोलेशन वॉर्डमध्ये 474 रुग्ण , तपासणी पूर्ण केलेल्या 460 व्यक्ती ( तपासणी अहवाल निगेटिव्ह ) 448 व्यक्ती निगेटिव्ह 12 व्यक्ती पॉझिटिव्ह टेस्ट झालेल्या व्यक्तींवर सिव्हिल हॉस्पिटलमध्ये उपचार सुरू आहेत. तर एक रुग्ण दगावला असल्याची माहिती जिल्हाधिकारी मिलिंद शंभरकर यांनी गुरुवारी संध्याकाळी प्रसारमाध्यमांशी बोलताना दिली.
-------------
ब्रेकिंग बातम्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आम्हाला 95 6161 7373 या नंबरला WhatsApp करा आणि लिहा “Mangalwedha Times News”

No comments:

Post a Comment