CoronaVirus : सोलापुरातील 'या' भागात आढळले नवीन 4 पॉझिटिव्ह रुग्ण - Mangalwedha Times

Breaking

Monday, April 27, 2020

CoronaVirus : सोलापुरातील 'या' भागात आढळले नवीन 4 पॉझिटिव्ह रुग्ण


मंगळवेढा टाईम्स ऑनलाईन । सोलापुरात आज आणखी 4 कोरोना बाधित रुग्णांची वाढ झाली आहे. यामुळे कोरोना बाधीताची त्यांची संख्या 65 झाली आहे.यातील पाच जणांचा यापूर्वीच उपचारादरम्यान मृत्यू झाला आहे .आज जे नवीन 4 रुग्ण मिळाले. यात दोन शास्त्रीनगर भागातील असून एक सिविल हॉस्पिटल परिसरातील तर अन्य एक फॉरेस्ट चांदणी चौक भागातील आहे.


आतापर्यंत 1280 जणांची कोरोना चाचणी झाली आहे. यातील 1075 अहवाल प्राप्त झाले आहेत , त्यात 1075 निगेटिव्ह तर 65 अहवाल पॉझिटिव्ह आले आहेत.


   
सोलापुरात लागू असलेल्या काटेकोर संचारबंदी, लॉक डाऊन ची मुदत आज मध्यरात्री 12 वाजता संपत आहे. पोलीस आयुक्त अंकुश शिंदे यांनी आज दिनांक 27 रोजी सायंकाळी नव्याने सुधारित मनाई आदेश जारी केले आहेत.यानुसार आज मध्यरात्री 12 नंतर म्हणजे दिनांक 28 पासून येत्या दिनांक 3 मे 2020 च्या मध्यरात्री पर्यंत याची अंमलबजावणी राहील.
      

या आदेशानुसार शहरातील सर्व प्रवासी खाजगी प्रवासी, सार्वजनिक वाहतूक बस सेवा बंद राहील. याच बरोबर (कोरोना कार्य करणारी आस्थापन वगळून) सर्व शासकीय कार्यालय बंद राहतील.याचबरोबर बँक व आर्थिक व्यवहार करणारी आस्थापन ही बंद राहतील.याच बरोबर शहरातील सर्व दुकाने ,सेवा आस्थापन, उपहारगृह, खाद्यगृह, शॉपिंग कॉम्प्लेक्स, मॉल मनोरंजन ठिकाण , शैक्षणिक संस्था, व्यायाम शाळा , कन्फेशनरी, फरसाण, मिठाईची दुकाने, मास विक्री मटण , अंडी विक्री दुकान बंद राहतील. 


भाजीपाला फळे आणि इतर हातगाड्यांवर फिरून विक्री करण्यासही बंदी असेल. सर्वधर्मीयांच्या सर्व धार्मिक स्थळात नित्य उपचार होतील .मात्र इतर भाविकांना याठिकाणी  गर्दी करता येणार नाही . तसेच स्वतःच्या घरी कुटुंबाशिवाय इतर बाहेरील व्यक्ती घेऊन कोणतेही धार्मिक विधी करता येणार नाही.

  
अंत्यसंस्कारासाठी ही 20 पेक्षा अधिक लोकांना एकत्र येण्यास परवानगी नसेल. 5 पेक्षा अधिक लोकांना सार्वजनिक ठिकाणी एकत्र येता येणार नाही सर्व प्रकारचे समारंभ सांस्कृतिक कार्यक्रम उत्सव ,उरूस  जत्रा ,सभा, आंदोलन मेळावे मिरवणुका यास मनाई आहे.


लॉक डाऊन काळात लोकांना सुविधा व्हाव्यात या दृष्टीने काही सवलती देण्यात आल्या आहेत .
यात सकाळी 6 ते 9 या वेळेत दूध विक्री व वाटप.सकाळी आणि 6 ते 9 या वेळेत कृषी उत्पन्न बाजार समितीत विक्रेत्यांना भाजीपाला फळ विक्री खरेदी करता येईल. तेथील लिलाव होणार नाहीत.


शहरातील कृषी उत्पन्न बाजार समिती तसेच मंगळवार पेठ, मधला मारुती येथील भुसार मालाची होलसेल दुकान सुरू राहतील . जेणेकरून किराणा दुकानदारांना येथून माल खरेदी करता येईल. ही वेळ सकाळी 10 ते दुपारी 1 वाजेपर्यंत आहे.शहरातील किराणा दुकान सकाळी 10 ते दुपारी 1 वाजेपर्यंत खुली राहतील.
ज्या शेतकऱ्यांना , व्यापाऱ्यांना भाजी विक्री करण्यासाठी 21 ठिकाण निश्चित करण्यात आली आहे .या ठिकाणी भाजीपाला आणि फळ विक्री करता येईल .


किरकोळ भाजी विक्रेते यांनी देखील या कालावधीत भाजीपाला व फळे विक्री करावी यासाठी 10 ते 1 ही वेळ देण्यात आली आहे.खत कीटकनाशक बी बियाणे विक्रीची दुकानात सकाळी 10 ते 1 या वेळेत उघडे राहतील, तर कृषी करता लागणारी यंत्राची दुकाने,  त्यासाठीचे पुरवठादार सुटे भाग धारक दुरुस्ती दुकानात याच वेळेत उघडे राहतील .शेती यंत्रणेशी संबंधित भाड्याने घ्यावयाच्या साधनांचा पुरवठा करणारी केंद्रही ही 10 ते 1 या वेळेत उघडी राहतील. 


रेशन दुकान साठी सकाळी 10 ते 1 ही वेळ देण्यात आली आहे. एटीएम सेवा दिवसभर सुरू राहतील .
घरपोच सेवा देणारे फळ भाजीपाला आणि भुसार माल यांना सकाळी 10 ते दुपारी 1 पर्यंत  मुभा देण्यात आली आहे. दवाखाना आणि औषध दुकान त्यांना दिलेल्या वेळेप्रमाणे सुरू राहतील.


चार चाकी वाहनांना परवानगी नाही .दुचाकी वाहनांवर फक्त चालकास परवानगी असेल. शक्यतो आपल्या घराजवळच्या दुकान आणि भाजी मंडई तूनच खरेदीसाठी परवानगी देण्यात आली आहे.खरेदीला जाणाऱ्यांनी ओळखपत्र जवळ बाळगावे असे सांगितले आहे.

---------------------
ब्रेकिंग बातम्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आम्हाला 9561617373 या नंबरला WhatsApp करा आणि लिहा “Mangalwedha Times News”

No comments:

Post a Comment