Breaking : सोलापूरात 4 नवे कोरोना पॉझिटिव्ह एकूण संख्या 65 वर - Mangalwedha Times

Breaking

Monday, April 27, 2020

Breaking : सोलापूरात 4 नवे कोरोना पॉझिटिव्ह एकूण संख्या 65 वर


मंगळवेढा टाईम्स ऑनलाईन । पुणे विभागातील 230 कोरोना बाधित रुग्ण बरे होऊन घरी गेले असून विभागात कोरोना बाधीत रुग्णांची संख्या 1 हजार 457 झाली आहे.  तर ॲक्टीव रुग्ण 1 हजार 139 आहेत. विभागात कोरोनाबाधीत एकुण 88 रुग्णांचा मृत्यू झाला आहे. तसेच 48 रुग्ण  गंभीर असून उर्वरीत निरीक्षणाखाली आहेत, अशी माहिती विभागीय आयुक्त डॉ.दीपक म्हैसेकर यांनी दिली.
 


विभागात 1 हजार 457 बाधित रुग्ण असून 88 रुग्णांचा मृत्यू झाला आहे. यापैकी पुणे जिल्हयात 1 हजार 319 बाधीत रुग्ण असून 80 रुग्णांचा मृत्यू झाला आहे. सातारा जिल्हयात 33 बाधीत रुग्ण असून 2 रुग्णांचा मृत्यू झाला आहे. सोलापूर जिल्हयात 65 बाधीत रुग्ण असून 5 रुग्णांचा मृत्यू झाला आहे. सांगली जिल्हयात 29 बाधीत रुग्ण असून  एका रुग्णाचा मृत्यू झाला आहे. कोल्हापूर  जिल्हयात 11 बाधीत रुग्ण आहेत. 
आजपर्यत विभागामध्ये एकुण  15 हजार 811 नमूने तपासणीसाठी पाठविण्यात आले होते त्यापैकी 14 हजार 935 चा अहवाल प्राप्त झाला आहे. 877 नमून्यांचा अहवाल प्रतीक्षेत आहे. प्राप्त अहवालांपैकी 13 हजार 428 नमून्यांचा अहवाल निगेटीव्ह असून 1 हजार 457 चा अहवाल पॉझिटिव्ह आहे.


 
आजपर्यंत विभागामधील 54 लाख 35 हजार 546 घरांचे सर्वेक्षण पूर्ण करण्यात आले असून त्याअंतर्गत 2 कोटी 6 लाख 3 हजार 94 व्यक्तींची तपासणी केली आहे. त्यापैकी 1 हजार 131 व्यक्तींना अधीक तपासणीसाठी संदर्भीत करण्यात आले आहे. 
                       
----------------------
ब्रेकिंग बातम्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आम्हाला 9561617373 या नंबरला WhatsApp करा आणि लिहा “Mangalwedha Times News”

No comments:

Post a Comment