धोका वाढतोय : सोलापुरात आज 3 नवे रुग्ण पॉझिटिव्ह आढळले ; एकाचा मृत्यू - Mangalwedha Times

Breaking

Tuesday, April 28, 2020

धोका वाढतोय : सोलापुरात आज 3 नवे रुग्ण पॉझिटिव्ह आढळले ; एकाचा मृत्यू

मंगळवेढा टाईम्स ऑनलाईन । गेल्या महिनाभरापासून लॉकडाऊनमुळे नजरकैदेत असलेल्या सोलापूर वासियांसाठी एक धक्का देणारी बातमी आहे. अाज मंगळवारी दिवसभरात ३ कोरोनाने बाधित रुग्ण अाढळून अाले तर एका पुरुषाचा मृत्यू वैद्यकीय अहवालात स्पष्ट झाले अाहे. 


गेल्या १४ दिवसात कोरोना बाधितांचा अाकडा फुगून ६८ वर पोहचला अाहे. अद्याप एकही रुग्ण कोरोनामुक्त न झाल्याने व  बाधितांचा अाकडा वाढत चालल्याने सोलापूरची बैचेनी वाढली अाहे.


आज दिवसभरात ५८ अहवाल प्राप्त झाले त्यापैकी ५५ रुग्ण निगेटिव्ह आढळून आले तर त्यात तीन रुग्णांना कोरोनाची लागण झाल्याचे स्पष्ट झाले. आज रेल्वे स्टेशन, सिद्धेश्वर पेठ, बापूजी नगर येथे प्रत्येकी एक रुग्ण आढळून आला. यातील बापूजी नगर येथे राहणाऱ्या एका पुरुषाचा मृत्यू झाला आहे.


सोमवारी सोलापुरातील कोरोना बाधित रुग्णांची ६५ संख्या होती. कोरोना बाधित सक्रिय रुग्णांची संख्या ६२आहे तर सहा जणांचा उपचारा दरम्यान मृत्यू झाल्याची नोंद आहे.


सध्या आयसोलेशनमध्ये असलेल्यांची संख्या १४६९असून त्यापैकी ११३३ जणांचा अहवाल प्राप्त झ‍ाला तर १०६५जणांचा अहवाल निगेटिव्ह अाला. अजून ३३६ जणांच‍ा अहवाल प्रलंबित असल्याची माहिती जिल्हाधिकारी मिलिंद शंभरकर यांनी दिली.


------------------
ब्रेकिंग बातम्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आम्हाला 9561617373 या नंबरला WhatsApp करा आणि लिहा “Mangalwedha Times News”

No comments:

Post a Comment