टेन्शन वाढले : सोलापुरात कोरोचा दुसरा बळी;कोरोचा 15 वा रुग्ण आढळला - Mangalwedha Times

Breaking

Sunday, April 19, 2020

टेन्शन वाढले : सोलापुरात कोरोचा दुसरा बळी;कोरोचा 15 वा रुग्ण आढळला


मंगळवेढा टाईम्स वृत्तसेवा । सध्या पूर्ण जगामध्ये थैमान घालत असलेला कोरोना व्हायरसच्या जाळ्यात सोलापूर जिल्हा अडकलेला पाहायला मिळत आहे. कोरोना विषाणूचा संसर्ग झालेल्या रुग्णांचा आकडा १५ वर जाऊन पोहचला असल्याची माहिती जिल्हाधिकारी मिलिंद शंभरकर यांनी दिली आहे.


सोलापुरात दिवसेंदिवस कोरोनाची संख्या वाढतच आहे. त्यामुळे जिल्ह्यात भीतीचे वातावरण पसरले आहे.त्यात आजच एक महिला पॉझिटिव्ह निघालेली असून तिचा उपचारादरम्यान मृत्यू झाला आहे.त्या महिलेच्या संपर्कातील लोकांना जिल्हा रुग्णालयात तपासणीसाठी दाखल करण्यात आले आहे.


सोलापूर करोना update
एकूण स्वॅप तपासणी :718
एकूण प्राप्त अहवाल : 505
निगेटिव्ह : 490
Positive : 15
मृत : 02
उपचार सुरू असलेले : 13


आज प्राप्त अहवालांमध्ये नव्याने 01 रुग्ण महिला  positive आढळली  असून तिचा  उपचार घेत असताना मृत्यू झाला असून सदर महिला ही भारत रत्न इंदिरा नगर परिसरातील असून तिच्या संपर्कातील ०८ जणांना तपासणीसाठी ताब्यात घेण्यात आलेले आहे. भारत रत्न इंदिरा नगर परिसराला CONTEMNEMT झोन जाहीर करण्यात आले असून सदर भाग सील करण्यात आला आहे. सदर भागात मनपा मार्फत सर्वेक्षण सुरु करण्यात आले आहे.


याबाबत जिल्हाधिकार्‍यांनी सोलापूर शहर व जिल्ह्यातील नागरिकांना घरातच राहण्याचे आवाहन केले असून सर्वांनी मास्कचा वापर करावा व कामाशिवाय घराबाहेर पडू नये असे आवाहन केले आहे.

----------------------
ब्रेकिंग बातम्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आम्हाला 9561617373 या नंबरला WhatsApp करा आणि लिहा “Mangalwedha Times News”

No comments:

Post a Comment