CoronaVirus : अन्य जिल्हयातून मंगळवेढयात 11 हजार 941 नागरिक आल्याची प्रशासनाकडे नोंद - Mangalwedha Times

Breaking

Wednesday, April 15, 2020

CoronaVirus : अन्य जिल्हयातून मंगळवेढयात 11 हजार 941 नागरिक आल्याची प्रशासनाकडे नोंदमंगळवेढा टाईम्स वृत्तसेवा । मंगळवेढा तालुक्यात परजिल्हयातून आत्तापर्यंत जवळपास 11 हजार 941 नागरिक आल्याची नोंद प्रशासनाकडे झाली असून त्यांची तपासणी करून पाठविण्यात आले आहे.दरम्यान ग्रामीण भागासाठी  बालाजीनगर येथे विलगीकरण कक्ष उभारण्यात आला असून येथे जवळपास 26 लोकांना या कक्षात ठेवण्यात आल्याचे सांगण्यात आले.अत्यावश्यक सेवेतील 30 वाहन चालकांची तपासणी करण्यात येणार आहे.
सोलापूर जिल्हयालगत असलेल्या सांगली , सातारा, पुणे, उस्मानाबाद,बीड यासह अन्य जिल्हयातून मंगळवेढयात आत्तापर्यंत 11 हजार 941 नागरिक आल्याची प्रशासनाकडे नोंद झाली आहे.या आलेल्या नागरिकांची तपासणी करून त्यांना त्यांच्या घरी पाठविण्यात आले आहे.बाहेरून आलेल्या प्रत्येक व्यक्तीवर लक्ष आरोग्य विभाग ठेवून आहे.नव्याने येणार्‍या व्यक्तीची तात्काळ तपासणी केली जात आहे.

मंगळवेढा ग्रामीण रुग्णालयाकडे आत्तापर्यंत 613 जणांना तपासण्यात आले आहे.मंगळवेढा शहरात आलेल्या लोकांसाठी श्री संत दामाजी महाविदयालय व मदनसिंह मोहिते पाटील महाविदयालय या दोन ठिकाणची कोरोंटाईन केअर सेंटर उभारणी करण्यासाठी जागेची पाहणी करण्यात आली असून त्यापैकी एका ठिकाणी लवकरच कोरोना केअर सेंटर उभारले जाणार आहे.
ग्रामीण भागातील बोराळे , भोसे, आंधळगांव, मरवडे,सलगर बु या पाच प्राथमिक आरोग्य केंद्रांतर्गत आत्तापर्यंत 11 हजार 941 नागरिक परजिल्हयातून मंगळवेढयात आल्याची शासकीय दप्तरी नोंद झाली आहे.या सर्व बाहेरून आलेल्या नागरिकांची तपासणी करून त्यांना घरी पाठविण्यात आले आहे. आजमितीला एकही मंगळवेढा तालुक्यात कोरोना पॉझिटीव्ह रुग्ण नसल्याचे प्रशासनाकडून सांगण्यात आले.कोरोना या संसर्गजन्य आजाराला अटकाव करण्यासाठी लॉकडाऊन केल्यामुळे जीवनावश्यक वस्तूंचा पुरवठा करणार्‍या 30 वाहन चालकाना परवानगी देण्यात आली होती.या सर्व वाहनचालकांची तपासणी करण्यात येणार आहे. या चालकांना त्यांच्या स्वतःच्या घरात विलगीकरण करण्यात येणार असल्याचे आरोग्य विभागाकडून सांगण्यात आले.

ग्रामीण भागासाठी बालाजी नगर येथील आश्रमशाळेत कोरंटाईन केअर सेंटर उभारण्यात आले आहे.येथे जवळपास 26 व्यक्तींना ठेवण्यात आले आहे. हे सर्व नागरिक बाहेरच्या जिल्हयातून आलेले असून त्यांच्या भोजनाची व्यवस्था बालाजी शिक्षण मंडळाकडून करण्यात आली आहे.सकाळी नाष्टा,दोन टाईम जेवणाची व्यवस्था करण्यात आली आहे.त्यांच्या सुरक्षेसाठी एक होमगार्ड,एक पोलिस कर्मचारी तैनात करण्यात आला आहे.
-----------
ब्रेकिंग बातम्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आम्हाला 9561617373 या नंबरला WhatsApp करा आणि लिहा

No comments:

Post a Comment