सरकारचा मोठा निर्णय ! सरकारी कार्यालयांमध्ये उद्यापासून 10 टक्‍के उपस्थिती - Mangalwedha Times

Breaking

Sunday, April 19, 2020

सरकारचा मोठा निर्णय ! सरकारी कार्यालयांमध्ये उद्यापासून 10 टक्‍के उपस्थितीमंगळवेढा टाईम्स वृत्तसेवा । लॉकडाउन वाढण्यापूर्वी राज्य सरकारने सरकारी कार्यालयांमध्ये पाच टक्‍के कर्मचारी उपस्थित राहतील, असे सरकारने स्पष्ट केले. मात्र, लॉकडाउन 3 मेपर्यंत वाढल्याने प्रतिबंधात्मक उपाययोजना करण्याच्या दृष्टीने आता सर्व शासकीय कार्यालयांमध्ये रोटेशन पध्दतीने 10 टक्‍के कर्मचारी उपस्थित राहतील, असा निर्णय शनिवारी राज्य सरकारने घेतला असून त्याची अंमलबजावणी उद्या सोमवारपासून (ता. 20) केली जाणार आहे.


कोरोना या विषाणूचा संसर्ग रोखण्यासाठी राज्यात 22 मार्चपासून लॉकडाउन लागू करण्यात आला आहे.मात्र, आता प्रतिबंधात्मक उपाययोजनांची गरज लक्षात घेऊन सरकारने सरकारी कार्यालयात 10 टक्‍के कर्मचारी रोटेशन पध्दतीने उपस्थित राहतील, असे सरकारने स्पष्ट केले.


मंत्रालय स्तरावरील सहसचिव व उपसचिवांना कार्यालयात उपस्थित राहणे बंधनकारक राहणार आहे. मात्र, महिला अधिकाऱ्यांना सवलत देण्याचा निर्णय संबंधित कार्यालय प्रमुख तथा सचिवांनी घ्यावा, असेही सरकारने आदेशात नमूद केले आहे. कर्मचाऱ्यांच्या सोयीसाठी मंत्रालयातील उपहारगृह तत्काळ सुरु केले जाणार असून तशा सूचनाही संबंधितांना दिल्या आहेत.

-------------------------
ब्रेकिंग बातम्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आम्हाला 9561617373 या नंबरला WhatsApp करा आणि लिहा “Mangalwedha Times News”

No comments:

Post a Comment