सातारा जिल्ह्यात ट्रक मोटारसायकलच्या अपघातात दोघे ठार - Mangalwedha Times

Breaking

Monday, February 17, 2020

सातारा जिल्ह्यात ट्रक मोटारसायकलच्या अपघातात दोघे ठार


मंगळवेढा टाईम्स वृत्तसेवा:-
सातारा पाटण तालुक्यातील मल्हारपेठ ते पंढरपूर राज्य मार्गावर कराड तालुक्यातील उंब्रज - मसूरदरम्यान मालट्रकखाली चिरडून मोटारसायकलवरील दोघांचा मृत्यू झाला .

नितीन पोपट कापुरे ( २५ ) व रितेश बबन गायकवाड ( दोघेही रा . जयभीमनगर , इचलकरंजी , जि . कोल्हापूर , हल्ली रा . माळीनगर , उंब्रज ) अशी मृतांची नावे आहेत .

मसूरकडून उंब्रजकडे निघालेला ट्रक उंब्रजपासून तीन किलोमीटर अंतरावर कृष्णा नदीच्या पुलाजवळ आला तेव्हा समोरून येणाऱ्या हीरो होंडा मोटारसायकलशी त्याची धडक झाली . त्यामुळे मोटारसायकलवरील दोघेही खाली पडले व ट्रकच्या मागील चाकाखाली चिरडले गेले .

त्यातील नितीन कापुरे याचा जागीच मृत्यू झाला , तर रितेश गायकवाड गंभीर जखमी झाला . त्याला तातडीने उपचारासाठी कराडला हलवण्यात आले , परंतु उपचार सुरू असतानाच त्याचाही मृत्यू झाला .

No comments:

Post a Comment