पोलिसांच्या ताब्यातून पळालेल्या संशयितास सोलापुरात अटक - Mangalwedha Times

Breaking

Sunday, February 16, 2020

पोलिसांच्या ताब्यातून पळालेल्या संशयितास सोलापुरात अटकमंगळवेढा टाईम्स वृत्तसेवा:-

उमदी पोलिस ठाण्याकडील बलात्काराच्या गुन्ह्यातील संशयित मल्लापा बाबू कांबळे (वय 19, रा. बोर्गी खुर्द, ता. जत) शुक्रवारी पोलिसांना चकवून पसार झाला होता. त्याला शनिवारी पोलिसांनी पकडले. पोलिस शुक्रवारी कांबळे याला ताब्यात घेऊन न्यायालयात हजर करून परत घेऊन येत होते. त्यावेळी सायंकाळी सात वाजण्याच्या सुमारास कोळगिरीपासून 3 किलोमीटर अंतरावर उमदीजवळ पोलिसांनी वाहन लघुशंखेसाठी थांबवले. त्यावेळी पोलिसांना चकवा कांबळे हा अंधाराचा फायदा घेऊन पळून गेला.

उमदी पोलिस ठाण्यातील पोलिस निरीक्षक दत्तात्रय कोळेकर यांच्या पथकाने त्याचा शोध सुरू केला.तो कर्नाटकात गेल्याचे समजले. पोलिस पथकाने विजयपूर येथे सोलापूर बायपासजवळ सापळा रचून कांबळे याला पकडले.

या कारवाईत निरीक्षक कोळेकर, उपनिरीक्षक नामदेव दंडगे, हवालदार कोष्टी, हवालदार गडदे, हवालदार, कोळी, पोलिस नाईक नितीन पलूसकर, पोलिस नाईक श्रीशैल वळसंग ,पोलिस संभाजी करांडे, मुल्ला, गोदे यांनी सहभाग घेतला.

No comments:

Post a Comment