चोरट्यांनी पाण्याच्या पाईप नेल्या चोरून - Mangalwedha Times

Breaking

Monday, February 17, 2020

चोरट्यांनी पाण्याच्या पाईप नेल्या चोरून


मंगळवेढा टाईम्स वृत्तसेवा:-
सोलापुरातील बाळे परिसरातील राहुलनगर आणि डुमणेनगर येथून चोरट्यांनी महापालिकेचे 11 लाख 81 हजार 787 रुपयांचे 302 पाइप चोरून नेले. ही घटना 14 फेब्रुवारी रोजी पहाटे तीन ते चार यावेळेत घडली. 

याप्रकरणी फौजदार चावडी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.या प्रकरणात महापालिका विभागीय कार्यालयातील कनिष्ठ अभियंता विक्रांत विलास लोकापुरे (वय 27, रा. व्यंकटेश अपार्टमेंट, रेल्वे लाइन्स, सोलापूर. सध्या- कर्णिकनगर, श्रीकृष्ण दुग्धालयाजवळ, सोलापूर) यांनी फिर्याद दिली आहे.

ट्रक चालकासह पाच ते सहा जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. जुनी जलवाहिनी खराब झाल्याने महापालिकेच्यावतीने बाळे परिसरातल राहुलनगर आणि डुमणेनगर येथे नवीन जलवाहिनी टाकण्याच्या कामाला मंजुरी मिळाली आहे. यासाठी महापालिकेच्या पथकाने राहुलनगर आणि डुमणेनगर येथे पाइप आणून ठेवले होते. चोरट्यांनी एकूण 302 पाइप 14 फेब्रुवारी रोजी पहाटे ट्रकमधून चोरून नेले. महापालिकेच्या पथकाने नगरसेवक गणेश पुजारी यांच्यासोबत पाहणी केली. 

या परिसरातील रहिवासी नाईकनवरे यांनी ट्रक घेऊन आलेल्या लोकांनी पाइप नेल्याचे सांगितले. 14 फेब्रुवारी रोजी मध्यरात्री "मी गाडीचा आवाज झाल्याने उठून घराबाहेर आलो. त्यावेळी मला पाच ते सहा लोक महानगरपालिकेचे पाइप ट्रकमध्ये ठेवताना दिसले. पाइप कोठे घेऊन चालला आहे असे विचारल्यानंतर इससे बडा पाइप लानेका है.. असे त्या लोकांनी सांगितल्याचे नाईकनवरे म्हणाले. नाईकनवरे यांनी ट्रकच्या उजेडात ट्रकचा नंबर पाहिल्याचे सांगितले.

दरम्यान, नाईकनवरे यांनी पाहिलेला ट्रकचा नंबर चुकीचा असल्याचे तपासात समोर आले आहे. चोरट्यांचा तपास चालू असल्याचे पोलिस उपनिरीक्षक सोमनाथ देशमाने यांनी सांगितले.

No comments:

Post a Comment