आठ वर्षीय बालिकेवर अत्याचार,पॉस्को कायद्याअंतर्गत गुन्हा दाखल - Mangalwedha Times

Breaking

Sunday, February 16, 2020

आठ वर्षीय बालिकेवर अत्याचार,पॉस्को कायद्याअंतर्गत गुन्हा दाखल


मंगळवेढा टाईम्स वृत्तसेवा:-
एका आठ वर्षीय बालिकेला फूस लावून पळवून नेत तिच्यावर अत्याचार केल्याची घटना कुंडी (ता.सेलू, जि.परभणी) शिवारात घडली. या प्रकरणी सेलू पोलिस ठाण्यात आरोपीविरूध्द पॉस्को कायद्याअंतर्गत शनिवारी (ता.१५) अत्याचाराचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. 

सेलू पोलिसांनी घटनेतील आरोपीला शनिवारी मध्यरात्री अटक केली.
कुंडी (ता.सेलू) येथे गुरूवारी सायंकाळी सहाच्या सुमारास गावातीलच अशोक भगवान बालटकर (वय २५) या युवकाने घरासमोरील अंगणात खेळत असलेल्या एका आठ वर्षीय बालिकेला हरबऱ्याचा टहाळ देतो, अशी फूस लावून पळवून नेले होते. बराच वेळ झाला तरीही बालिका घरात, अंगणात व परिसरात दिसत नसल्याने पालकांनी शोधा शोध सुरू केला.

नेहमीच बालिकेच्या घराकडे येत असलेला आरोपी अशोक याच्यासोबत बालिका दिसल्याचे काही ग्रामस्थांनी बालिकेच्या पालकांना सांगितले. त्यानंतर बालिकेच्या वडीलांनी सेलू पोलिस ठाण्यात फिर्याद दिली होती. आरोपी विरूध्द फूस लावून पळवून नेल्या प्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला होता.

No comments:

Post a Comment