क्रिकेट सट्ट्यावर पोलिसांचा छापा - Mangalwedha Times

Breaking

Monday, February 17, 2020

क्रिकेट सट्ट्यावर पोलिसांचा छापा


मंगळवेढा टाईम्स वृत्तसेवा:-
घनसावंगी तालुक्यातील रांजणी येथे एका मेडिकलवर क्रिकेट सट्ट्याचा डाव रंगला होता. याप्रकरणी विशेष कृती दलाच्या पथकाने धाड टाकून एकाला अटक केली आहे. पोलिसांनी 47,800 रुपये रोख, मोबाइल व जुगार साहित्य असा 57 हजाराचा मुद्देमाल जप्त केला आहे.

मिळालेली माहिती अशी की, रांजणीत 20-20 इंग्लंडविरुद्ध साऊथ आफ्रिका क्रिकेट सामन्यावर सट्टा खेळला जात असल्याची माहिती विशेष कृती दलाचे पोलिस निरीक्षक यशवंत जाधव यांना खबऱ्यामार्फत मिळाली होती. त्याआधारे पोलिसांनी रांजणी येथील आनम मेडिकलवर धाड टाकली. अख्तर अली सैय्यद अली यास सट्टा खेळताना रंगेहात पकडले. त्याच्या ताब्यातून रोख 47,800, मोबाइल व जुगार साहित्य असा 57 हजारांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.

दरम्यान, अख्तर अली याने रोहित सेठ (चिंतामणी ट्रॅव्हल्स, जालना) आणि दीपक सेठ (सेलू) यांच्या सांगण्यावरून सट्टा घेत असल्याची कबुली दिली आहे. पोलिस पुढील तपास करत आहे.

No comments:

Post a Comment