जिल्हा दूध संघाची २७ फेब्रुवारीस पुढील सुनावणी - Mangalwedha Times

Breaking

Monday, February 17, 2020

जिल्हा दूध संघाची २७ फेब्रुवारीस पुढील सुनावणी


मंगळवेढा टाईम्स वृत्तसेवा:-
सोलापूर जिल्हा सहकारी दूध उत्पादक व प्रक्रिया संघाच्या आर्थिक कारभाराबाबत दुग्धचे पुणे विभागाचे विभागीय उपनिबंधक सुनील शिरापूरकर यांनी दूध संघाला कारणे दाखवा नोटीस बजावली होती. या नोटीसवर आज सुनावणी झाली असून पुढील सुनावणीसाठी 27 फेब्रुवारी ही तारीख देण्यात आली आहे.

जिल्हा दूध संघाचे संचालक मंडळ बरखास्त करून संघावर प्रशासक नियुक्त का करू नये? याबाबत खुलासा करण्याची सूचना दूध संघास करण्यात आली आहे. या नोटीस वर आज विभागीय उपनिबंधक शिरापूरकर यांच्याकडे सुनावणी झाली.


No comments:

Post a Comment